धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:16 PM2018-12-10T17:16:54+5:302018-12-10T17:17:53+5:30

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Massive water flow from the dam | धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरुच

googlenewsNext
ठळक मुद्देइगतपुरी : नेत्यांचे दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त; पाणी टंचाईची भिती

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील मुकणे आणि दारणा धरणातुन सुरू असलेले आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरूच असुन, मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने लवकरच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल असे चिन्ह आहेत. हे सोडलेले पाणी थांबविण्यासाठी कुठलाही राजकीय पक्ष, किंवा नेता ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे. कमी पर्जन्यमानामुळे अनेक गावांमध्ये आता पासुनच पाणी टंचाई जाणवत आहे. तसेच अवघे ७१ टक्केच भरलेल्या मुकणे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे आवर्तन सुरु आहे, त्यामुळेच या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या तोंडचे पाणि पळाले आहे.
जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध झाला होता, मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ५ नोव्हेबरला दारणा, मुकणे धरणातून हजारो द.ल.घ.फु. पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. दारणा धरणातून - २८४२ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून ३६४ द.ल.घ.फु. पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर मात्र दारणा धरणातून आज पर्यंत ३२७८ द.ल.घ.फु. आणि मुकणे धरणातून १५ नोव्हेबर पासून ते आजपर्यंत तब्बल पाच पट म्हणजेच १६०७ द.ल.घ.फु. पाणी वैजापूर एक्सप्रेस कॅनॉलसाठी सोडण्यात आलेले असुन अजूनही दोन तीन दिवस हे पाणी सुरुच राहणार आहे. दारणा धरणात फक्त २३९० द.ळ.घ.फु. तर मुकणे धरणात फक्त ३०६२ द.ल. घ.फु. पाणीसाठा शिल्लक राहिले आहे.
दरम्यान जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करणाºया नेत्यांना मात्र महीन्याभरपासुन या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होणारे पाणी दिसत नाही का? ते आज का गप्प आहेत? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. आताच मुकणे धरणाचा साठा कमी झाल्याने पाइप जोडून विद्युत पंप शेतकºयांना पाण्यापर्यंत पोहोचवावे लागत आहेत. तेंव्हा उन्हाळ्यात तर परिस्थिती अधिक भयानक होईल असे शेतकरी बोलत आहेत..
......
विशेष म्हणजे याच मुकणे धरणातून नाशिक शहरासाठी ही पाणी उचलण्यात येणार असून त्याच्या पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जर नाशिकचे पाणी राखीव ठेवले तर शेतकºयांना किती पाणी मिळणार हा ही एक प्रश्न आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्याबरोबरच नाशिक शहरालाही पाणी टंचाइस सामोरे जावे लागणार आहे, त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास इगतपुरी तालुक्याला तीव्र पाणी टंचाईची भिती वाटू लागली आहे.
 

Web Title: Massive water flow from the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.