नाशिकमध्ये राजकिय पक्ष कार्यालयांच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 02:20 PM2019-05-23T14:20:53+5:302019-05-23T14:24:10+5:30

नाशिक-  नाशिक लोकसभा निवडणूकीच्या अटी तटीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीसांच्या वतीने सर्व राजकिय पक्षांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे मनसेच्या राजगड भोवती देखील बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Massive police settlement outside the political party offices in Nashik | नाशिकमध्ये राजकिय पक्ष कार्यालयांच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त

नाशिकमध्ये राजकिय पक्ष कार्यालयांच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देशांतता ठेवण्यासाठी कार्यवाहीराजकिय नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा

नाशिक-  नाशिकलोकसभानिवडणूकीच्या अटी तटीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलीसांच्या वतीने सर्व राजकिय पक्षांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे मनसेच्या राजगड भोवती देखील बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकसभा निवडणूकी यंदा प्रचंंड चुरस ह;ेती. सामान्यत: दोन पक्षात चुरस असली तरी यंदा नाशिकमध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, राष्टÑवादीचे समीर भुजबळ अपक्ष वंचीत आघाडीचे पवन पवार असे चार प्रमुख उमेदवार होते. या सर्वप्रकारांमुळे राजकिय कार्यकर्ते अभिनिवेशाने प्रचार करीत आहेत. त्याच प्रमाणे काही राजकिय पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांची फाटाफुटही होती. उमेदवार किंवा पक्षांना याबाबत माहिती असली तरी निवडणूकीच्या निकालापर्यंत अपेक्षेनुरूप सर्वांनीच संयम बाळगला होता. तरीही त्यानंतर राजकिय पक्षांमधील वैमनस्य तसेच आपसातील फाटाफुट यावर तीव्र प्रतिक्रीया उमटली जाण्याची शक्यता होती. त्याच बरोबर निकालानंतर देखील वाद उफळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात असल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क झाली. त्यामुळेच निकालाच्या पूर्व संध्येला राजकिय पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या होत्या. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे शांतता भंग केल्यास संबंधीत नेत्यांना जबाबदार धरण्यात येईल अशाप्रकारच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

गुरूवारी (दि. २३) सकाळपासून शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पक्ष कार्यालयांसमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्र उशिरापर्यंत हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Web Title: Massive police settlement outside the political party offices in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.