बाजार समितीच्या सभापतींकडून संचालकाला धमकी

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीत सभापती शिवाजी चुंबळे व संचालक शंकर धनवटे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.९) दुपारी घडली. दरम्यान, या घटनेनंतर धनवटे यांनी थेट पंचवटी पोलीस ठाणे गाठून चुंबळे यांनी शिवीगाळ करून तुझे हात पाय तोडतो, अशी धमकी दिल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्र वारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात बैठक सुरू असताना धनवटे यांनी सचिव अरुण काळे यांच्याकडून पैसे खाल्ले असा मुद्दा उपस्थित केल्याचा राग चुंबळे यांना आल्याने त्यांनी धनवटे यांना, ‘तू घरी कसा जातो तुझ्याकडे बघतो, तुझे हात पाय तोडतो’ असा दम दिला. सकाळी बाजार समिती कार्यालयात बैठक सुरू असताना हा प्रकार घडला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.