मराठा समाज आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:41 PM2018-07-23T15:41:29+5:302018-07-23T15:41:50+5:30

पाथर्डीफाटा येथे ढिय्या आंदोलन ; विठोबाला साकडे

Maratha society aggressive | मराठा समाज आक्रमक

मराठा समाज आक्रमक

Next
ठळक मुद्दे पाथर्डीफाटा येथे ढिय्या आंदोलन ; विठोबाला साकडे

नाशिक/सिडको : शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय त्वरीत जाहीर करावा यासाठी सोमवारी (दि.२३) सकाळी पाथर्डीफाटा येथे सकल मराठा समाज ,छत्रपती सेना,मराठा सोशल फांउंडेशन यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना सदबुध्दी द्यावी यासाठी विठोबाला साकडे देखील घालण्यात आले.
पाथर्डीफाटा येथे सकाळी दहा वाजता ठिय्या आंदोलनात समाज बांधवांनी टाळ ,मृदुंग वाजवित भजन करुन शासनाचा निषेध करण्यात आला.मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी सदबुध्दी देवो यासाठी विठोबाला साकडे घालण्यात आले.पाथर्डीफाटा येथे आंदोलन करणार असल्याची माहीती अंबड पोलीसांना आधीच असल्याने याठिकाणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीसांनी ४० ते ५० आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून दिले. या आंदोलनात पाथर्डी पंचक्रोशी, अंबड, सिडको, नाशिकसह परिसरातील समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: Maratha society aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.