मराठा मित्र, शिव-जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:20 AM2019-01-20T01:20:37+5:302019-01-20T01:21:17+5:30

छावा ही सर्व जातीधर्मांना सामावून घेणारी संघटना आहे; परंतु या संघटनेबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. नाशिकमध्ये मराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. परंतु आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नाही, असे परखड मत छावा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी व्यक्त केले.

Maratha buddy, Shiv-Jijau award ceremony will be in excitement | मराठा मित्र, शिव-जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

छावा संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे पवननगर येथे मराठा मित्र पुरस्कार व शिव-जिजाऊ पुरस्काराचे वितरण करताना संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील व अन्य मान्यवऱ

Next

सिडको : छावा ही सर्व जातीधर्मांना सामावून घेणारी संघटना आहे; परंतु या संघटनेबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. नाशिकमध्येमराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. परंतु आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची यापुढील काळात गय केली जाणार नाही, असे परखड मत छावा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी व्यक्त केले. मराठा समाजाच्या आरक्षणाला खरा विरोध नाशिकमधून भुजबळ यांनी केला होता. यामुळे यापुढील काळात भुजबळांना संघटना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशारा जावळे पाटील यांनी यावेळी दिला.
संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे सिडकोतील पवननगर येथील मैदानावर मराठा मित्र पुरस्कार व शिव-जिजाऊ पुरस्काराचे वितरण सोहळ्याप्रसंगी जावळे-पाटील बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे- पाटील, शिवा भागवत, महिला आघाडीच्या संगीता मुरकुटे, निवृत्ती दातीर, पवन मटाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संघटनेतर्फे मराठा मित्र पुरस्कार नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना प्रदान करण्यात आला तर नीलेश राणे, संगीता सोनवणे, दीपक चव्हाण, विलास जाधव, योगेश चुंभळे, डॉ. तुषार शिंदे, रवि पवार, संजय फटांगरे, रवींद्र दातीर, नितीन रोटे- पाटील, चंद्रकांत बनकर, दर्शन पाटील, बाळू गिते, मनीषा हिरे, संजीवनी जाधव आदींना शिव-जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. छावाचे शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी प्रास्तविक केले. जिल्हाध्यक्ष आशिष हिरे यांनी स्वागत तर राजेश बेदमुथा यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Maratha buddy, Shiv-Jijau award ceremony will be in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.