मनीषा कोईरालाने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:06 AM2018-08-23T01:06:25+5:302018-08-23T01:06:50+5:30

प्रख्यात अभिनेत्री मनीषा कोईरालाने बुधवारी (दि.२२) दुपारी कुटुंबीयां -समवेत भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. आपल्या आजारपणात आईने केलेल्या नवसपूर्तीसाठी आपण त्र्यंबकेश्वरला आलो असल्याचे तिने सांगितले.

 Manisha Koirala took the view of Trimbakeshwar | मनीषा कोईरालाने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

मनीषा कोईरालाने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

Next

त्र्यंबकेश्वर : प्रख्यात अभिनेत्री मनीषा कोईरालाने बुधवारी (दि.२२) दुपारी कुटुंबीयां -समवेत भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. आपल्या आजारपणात आईने केलेल्या नवसपूर्तीसाठी आपण त्र्यंबकेश्वरला आलो असल्याचे तिने सांगितले.  तिने त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजाविधी केला. पेंडोळे गुरु जी यांनी पौराहित्य केले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कार्यालयात संस्थानतर्फेशाल-श्रीफळ व भगवान त्र्यंबकेश्वराची प्रतिमा भेट देऊन मनीषासह तिच्या कुटुंंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, संतोष कदम, कैलास घुले उपस्थित होते. पुढील वर्षी कुणी सिनेमात काम करण्याविषयी विचारले तर मी विचार करेन असेही मनीषा म्हणाली. दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले चोख बंदोबस्त ठेवला. मनीषाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.






पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते.

Web Title:  Manisha Koirala took the view of Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.