दाभाडीत बालिकेवर लैंगीक अत्याचार;आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 05:35 PM2019-03-15T17:35:24+5:302019-03-15T17:35:37+5:30

मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथे तीन वर्षाच्या बालिकेस खेळण्यासाठी घेऊन जातो असे सांगून तिच्यावर लैंगीक अत्याचार करणाऱ्या जगन फकीरा निकम (६५) यास छावणी पोलीसांनी अटक केली.

Malefic atrocities on Dabhadeit Balika and the accused arrested | दाभाडीत बालिकेवर लैंगीक अत्याचार;आरोपीस अटक

दाभाडीत बालिकेवर लैंगीक अत्याचार;आरोपीस अटक

Next

मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथे तीन वर्षाच्या बालिकेस खेळण्यासाठी घेऊन जातो असे सांगून तिच्यावर लैंगीक अत्याचार करणाऱ्या जगन फकीरा निकम (६५) यास छावणी पोलीसांनी अटक केली. काल गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पीडित बालिकेच्या आईने छावणी पोलीसात फिर्याद दिली.
दाभाडी येथील मोठाभाऊ नगर भागात जगन निकम याने तीन वर्षीय बालिकेस गच्चीवर नेऊन लैंगीक अत्याचार केले. बालिकेस त्रास होऊ लागल्याने घडलेला प्रकार तिने आईला सांगितला यामुळे ही घटना उघडकीस आली. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटनास्थळी भेट दिली. जगन निकम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे करीत आहेत.

Web Title: Malefic atrocities on Dabhadeit Balika and the accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.