पंचवटी एक्सप्रेसचा ‘मेकओव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:50 PM2018-05-09T16:50:39+5:302018-05-09T16:50:39+5:30

‘आदर्श-पंचवटी एक्सप्रेस थोडी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर आर रही है! अशी उद्घोषणा झाली आणि ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस नावाच्या आगोदर ‘आदर्श’ शब्द जोडला गेला. नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे.

'Makeover' of Panchavati Express | पंचवटी एक्सप्रेसचा ‘मेकओव्हर’

पंचवटी एक्सप्रेसचा ‘मेकओव्हर’

Next
ठळक मुद्देनव्या कोऱ्या २१ डब्यांसह नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू स्वागताची केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली.

नाशिक : ‘आदर्श-पंचवटी एक्सप्रेस थोडी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर आर रही है! अशी उद्घोषणा झाली आणि ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस नावाच्या आगोदर ‘आदर्श’ शब्द जोडला गेला. नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे. स्वच्छता, सामाजिक सलोखा, लक्झरीअस आसनव्यवस्था आणि पाचवेळा लिम्का बुक मध्ये नोंद झालेल्या पासधारक बोगीचा लौकीक कायम राखत सकाळी ७.२० वाजता पंचवटी एक्सप्रेस आदर्श एक्सप्रेस नाशिकरोडहून मुंबईकडे रवाना झाली.
नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या  चाकरमान्यांसाठी पंचवटी एक्सप्रेस ही महत्वाची गाडी मानली जाते. १ नोव्हेंबर १९७५ पासून पंचवटी एक्सप्रेस दिमाखात धावत आहे. तब्बल ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सपे्रसचे रंगरूप बदलण्यात आले आहे. रेल्वेला भरघोस महसूल देणाºया पंचवटी एक्सप्रेसला रेल परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘आदर्श कोच’ निर्माण करण्यात आला होता.या कोचला सलग पाच वेळा लिम्का बुक आॅफ रॅकॉर्डमध्ये स्थान मिळाल्यानंतर याच बोगीच्या धर्तीवर संपुर्ण पंचवटी एक्सप्रेस आदर्श बनविण्यासाठी रेल परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आणि पंचवटी एक्सप्रेसला सर्वच्या सर्व २१ नवे डबे जोडण्यात आले.
संपुर्ण नवीन डबे आणि आरामदायी कुशनयुक्त आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व डब्यांना बायोटोयलेट जोडण्यात आले आहे. दोन डब्यांना जोडणाºयांना कपलिंगला इंटरलिंक दरवाजे करण्यात आले आहे तर स्लाईडींग विंडो करण्यात आल्या आहेत. नवीन बोगी या अधिक वेगाने धावू शकणाºया असल्याने रेल परिषदेच्यावतीने पंचवटी एक्सप्रेसचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरमित रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी यांनी ‘आदर्श पंचवटी एक्सप्रेस’साठी रेल्वेला सुचविलेल्या विविध कामांचा पाठपुरावा केला.
नाशिकरोड स्थानकावर सकाळी आदर्श पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव घोलप, सुनील आडके, गुरमित रावल, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजू फोकणे आदिंसह पासधारक प्रवासी, रेल परिषदेचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
--इन्फो--
स्वागताची औपचारिकता
पंचवटी एक्सप्रेसला आदर्श करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या  बिपीन गांधी यांचे रेल्वेस्थानकावरच दुर्देवी निधन झाल्याने पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत अत्यंत साध्यापद्धतीने करण्यात आले. पंचवटीच्या स्वागतासाठी आगोदर जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोलताशा, पेढे वाटप करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र गांधी यांच्या अकाली निधनामुळे स्वागताची केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली.
 

Web Title: 'Makeover' of Panchavati Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.