कुसुमाग्रज उद्यानाचा ‘मेकओव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:12 AM2018-02-26T01:12:26+5:302018-02-26T01:12:26+5:30

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत येणारे गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आता कात टाकत असून, त्याचा ‘मेकओव्हर’ लवकरच दृष्टीपथास येणार आहे.

'MakeOver' in McCarthy's garden | कुसुमाग्रज उद्यानाचा ‘मेकओव्हर’

कुसुमाग्रज उद्यानाचा ‘मेकओव्हर’

googlenewsNext

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत येणारे गोदाकाठावरील कुसुमाग्रज उद्यान आता कात टाकत असून, त्याचा ‘मेकओव्हर’ लवकरच दृष्टीपथास येणार आहे. सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून नूतनीकरण व सुशोभिकरणाची कामे सुरू असून, त्यामुळे दरवर्षी मराठी भाषादिनी नजरेस पडणारे उद्यानाचे ओंगळवाणे स्वरूप यंदा पाहायला मिळणार नाही. सन २००१ मध्ये माजी उपमहापौर गुरुमित बग्गा हे स्वीकृत सदस्य असताना त्यांच्या संकल्पनेतून गोदाकाठावरील जुन्या पंपिंग स्टेशनच्या जागेत कुसुमाग्रजांच्या काव्यशिल्पांच्या माध्यमातून उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, सुरुवातीचा वर्षभराचा काळ सोडला तर त्यानंतर उद्यानाला अवकळा प्राप्त होत गेली. कुसुमाग्रज उद्यानातील काव्यशिल्पांची तुटफूट झाली. साफसफाईअभावी पालापाचोळा साचत गेला. तेथील पूल, अ‍ॅम्पी थिएटरची दुरवस्था झाली, फरशा उखडल्या आणि आडवळणात असलेले हे उद्यान प्रेमीयुगुलांचे तसेच जुगाºयांचाही अड्डा बनले. याशिवाय, गोदावरी नदीला येणाºया महापुरामुळे उद्यानात बरीच पडझड होऊन दुरवस्था झाली. गेल्या १५ वर्षांत केवळ तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यापलीकडे उद्यानाची कामे होत नव्हती. दरम्यान, मागील पंचवार्षिक काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदर उद्यानाची पाहणी केल्यानंतर त्यांनी उद्यानाचा ‘मेकओव्हर’ करण्याचे काम हाती घेण्याचे आदेश महापालिकेतील आपल्या पदाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक यांनी जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या महासभेत उद्यानाच्या नूतनीकरणासाठी २ कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. त्यानुसार आराखडा तयार करून मक्तेदारामार्फत सध्या उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. कुसुमाग्रजांच्या काव्यशिल्पांना आकर्षक रूपात बघायला मिळणार असून, पर्यटकांसाठी स्वतंत्र ट्रॅकही आकर्षण ठरणार आहे. नव्या आराखड्यानुसार ५९६० चौरस फूट जागेवर नव्याने प्रशस्त उद्यान साकारले जाणार आहे. दोन अ‍ॅम्पी थिएटरची उभारणी करण्यात आली असून, रॅम्पही तयार करण्यात आले आहेत. याशिवाय स्वच्छतागृहाची उभारणी झालेली आहे. प्रवेशद्वाराचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. नदीकाठावरील भाग हा सहा फूट उंच उचलून त्याचे सपाटीकरण होत आहे. उद्यानात संवादकट्टा साकारण्यात येत असून, त्याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. कॅफे एरियासाठीही स्वतंत्र जागेचा प्रस्ताव आहे. एप्रिल महिन्याअखेर काम पूर्णत्वाला नेण्याचा मानस महापालिकेच्या सूत्रांनी बोलून दाखविला.
स्मार्ट सिटी अंतर्गत पुलांची निर्मिती
स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीपात्रावर दोन पुलांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यातील एका पुलामुळे गंगापूररोडवरून कुसुमाग्रज उद्यानात प्रवेश करणे सहज सोपे जाणार आहे. शिवाय गोदाकाठावरच असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इतिहास वस्तुसंग्रहालय आणि दुसºया तटावरील कुसुमाग्रज उद्यान यांची कनेक्टिव्हीटी या पुलामुळे होऊन पर्यटनाला चांगला वाव मिळणार आहे.

Web Title: 'MakeOver' in McCarthy's garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.