महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:35 AM2018-02-26T01:35:54+5:302018-02-26T01:35:54+5:30

राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी (दि.२५) लिमये सभागृहात महाजन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 Mahajan has been given a powerful MLA award | महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान

महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान

Next

नाशिक : राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी (दि.२५) लिमये सभागृहात महाजन यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी खासगी आणि शासकीय डॉक्टरांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत यावेळी बंग यांनी व्यक्त केले.  सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने देण्यात येणाºया या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, देणगीदार डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. विनायक नेर्लीकर, यांच्यासह सभागृहात महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. आदी मान्यवर उपस्थित होते. बंग यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख तसेच मानपत्र, स्मृतिचिन्ह महाजन यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी बंग यांनी महाजन यांची जीवनशैली आदर्श असल्याचे सांगून अशाचप्रकारे स्वस्थ जीवन जगण्यासाठी व विमा कंपन्यांच्या भरवशावर न राहता आदर्श जीवनशैली आचरणात आणावी असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या आरोग्य स्थितीवर बोलताना त्यांनी आजच्या वैद्यकीय व्यवसायाची स्थिती बघता रोग निवारण्यापेक्षा गरिबीनिर्मितीसाठी पूरक ठरत आहे. देशातील केवळ सात टक्के लोकांचा वैद्यकीय व्यवस्थेवर विश्वास टिकून आहे ही देशाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. देशाला डॉक्टरांची मोठी गरज आहे असे सांगून वैद्यकीय क्षेत्राविषयी सर्र्वसामान्यांच्या मनात असलेला संशय व भीती जोपर्यंत नष्ट होणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व रुग्णामध्ये निरोधी संबंध निर्माण होणार नाही, असे बंग यावेळी म्हणाले.  पुरस्काराला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी सावानाच्या या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्यास हा पुरस्कार मला प्रेरित करेल. जनसेवक म्हणून मी विधिमंडळात सर्वच घटकांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहे व यापुढे अधिक दमदारपणे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार आहे,अशा भावना व्यक्त केल्या.प्रारंभी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी कार्यक्षम आमदार पुरस्कारामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन अ‍ॅड. भानूदास शौचे यांनी केले. कार्याध्यक्ष अभिजीत बगदे यांनी स्वागत व प्रास्ताविक यांनी केले.
प्रकट मुलाखतीत व्यक्त केल्या भावना
सरकारने शेतकºयांना वीज, पाणी ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्या दृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजप सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आत्महत्या या नैराश्यापोटी होत असून, निसर्गाचा लहरीपणा या नैराश्याला कारणीभूत जरी असला तरी हे एकमेव कारण असू शकत नाही, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत महाजन यांनी या भावना व्यक्त केल्या. मुखत्यारसिंह पाटील व ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी मुलाखत घेतली.

Web Title:  Mahajan has been given a powerful MLA award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक