महाबळेश्वर, माथेरानला पर्यटनासाठी पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:28 AM2018-05-20T00:28:02+5:302018-05-20T00:28:02+5:30

उन्हाळी पर्यटनासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. शालेय सुटीचा अद्याप महिना शिल्लक राहिल्याने नाशिककर कुटुंबासमवेत देशाटनासाठी बाहेर पडले आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी अधिक पसंती दिली जात आहे.

 Mahabaleshwar, Matheran Favorite for Tourism | महाबळेश्वर, माथेरानला पर्यटनासाठी पसंती

महाबळेश्वर, माथेरानला पर्यटनासाठी पसंती

googlenewsNext

नाशिक : उन्हाळी पर्यटनासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहे. शालेय सुटीचा अद्याप महिना शिल्लक राहिल्याने नाशिककर कुटुंबासमवेत देशाटनासाठी बाहेर पडले आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी अधिक पसंती दिली जात आहे.  राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे महाबळेश्वर, पाचगणीसह माथेरान व तारकर्लीसारख्या समुद्र किनाऱ्यांवरही भटकंतीची चौकशी व आगाऊ नोंदणी होत आहे. या पर्यटन स्थळांवरील रिसॉर्ट हाउसफुल्ल असून, खासगी निवासव्यवस्थाही या भागात महागली आहे. हंगाम कॅच करण्यासाठी या भागातील व्यावसायिक संपूर्णत: सज्ज असून, निवास, वाहतुकीसह भोजनव्यवस्थेचे दरही आकाशाला भिडले आहेत. शहरातून नाशिक-पुणे, नाशिक-सातारा, नाशिक-पुणेमार्गे थेट महाबळेश्वर या शिवशाही बसेसला गर्दी वाढली आहे. नाशिक-सातारा तसेच नाशिक-महाबळेश्वर बससेवा पहाटे असून, पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला शिवशाही नाशिकमधून धावत आहे. एकूणच उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी नागरिक घराबाहेर पडल्याने वाहतुकीचा ताण निर्माण झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसह खासगी वाहनांनीदेखील लोक पर्यटनासाठी भटकंती करताना दिसून येत आहे. नाशिक ते महाबळेश्वरचा प्रवास माथेरानच्या तुलनेत अधिक लांबचा आहे. महाबळेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य, तेथील डोंगरदºया व थंड हवामान पर्यटकांना आकर्षित करते. राज्यातील दुसरे थंड हवेचे ठिकाण व मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे नेरळजवळील माथेरानला ही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. ‘माथेरानची राणी’ रुळावर धावत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
काश्मीरकडे पर्यटकांचा कल
काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत सातत्याने जरी चर्चा होत असली तरी उन्हाळ्यातील पर्यटनासाठी नाशिकमधून काश्मीरला अधिक पसंती मिळत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. काश्मीरचे निसर्ग सौंदर्य, खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने काश्मीर पर्यटनाला प्राधान्य देत असल्याचे टूर आॅपरेटर दत्ता भालेराव यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांकडून पर्यटकांचे आदरातिथ्यबाबत प्रचंड उत्सुकता व काळजी दाखविली जात असल्याचा पर्यटकांचा अनुभव त्यांनी सांगितला. जिल्हाभरातून सुमारे तीन ते चार हजार पर्यटक काश्मीरमध्ये पोहचले आहेत, तर काही पर्यटक परतीच्या प्रवासालाही लागले आहेत.

Web Title:  Mahabaleshwar, Matheran Favorite for Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन