Madhya Pradesh Chief Minister Trimbakrajaja Darshan! | मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून त्र्यंबकराजाचे दर्शन !

त्र्यंबकेश्वर : सालाबादाप्रमाणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कुटुंबासह त्र्यंबकेश्वर येथे भेट देत पूजाविधी केला. चौहान यांचे स्वागत नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर व भाजप शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी केले. त्र्यंबकेश्वरच्या कोठी हॉलमध्ये कपडे परिधान करु न ते थेट मंदिरात गेले. तेथे भगवान त्र्यंबकेश्वरला
लघुरु द्राभिषेक करु न ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाऊन त्यांनी धार्मिक विधी केला. गर्भगृहाबाहेर व गर्भगृहात पुजेचे पौरोहित्य योगेश दिघे, निषाद चांदवडकर, निरज शिखरे, विराज मुळे आदि पुरोहितांनी धार्मिक विधीचे पौरोहित्य केले. यावेळी चौहान यांनी सपत्नीक वकुटुंबिया समवेत पुजा केली.
दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दर्शनासाठी येतात. देशाबरोबरच मध्य प्रदेशात शांती सुबत्ता नांदावी यासाठी आपण ज्योतिर्लिंगाला साकडे घालीत असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे सुयोग वाडेकर, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.श्रीकांत गायधनी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या संपुर्ण जबाबदारी असणारे उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार महेंद्र पवार उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक कैलास आकुले, सुरेश चौधरी, मेघराज जाधव, श्रीमती राऊत आदिंनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.


Web Title: Madhya Pradesh Chief Minister Trimbakrajaja Darshan!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.