कैलास मठ येथे कमलपुष्पांनी पूर्णाहुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:23 AM2018-09-10T00:23:49+5:302018-09-10T00:23:55+5:30

कैलास मठ येथे श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्यानिमित्ताने रविवारी (दि.९) खास कोलकाता येथून तब्बल ११ हजार कमळाची फुले आणण्यात येऊन मंत्रोच्चारात ती अर्पण करण्यात आली. तसेच रुद्राभिषेक, कमलार्चन, बिलवार्चन तसेच विविध फुलांचे पुष्पार्चन करण्यात आले.

Lotus flower | कैलास मठ येथे कमलपुष्पांनी पूर्णाहुती

कैलास मठ येथे कमलपुष्पांनी पूर्णाहुती

Next

पंचवटी: कैलास मठ येथे श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्यानिमित्ताने रविवारी (दि.९) खास कोलकाता येथून तब्बल ११ हजार कमळाची फुले आणण्यात येऊन मंत्रोच्चारात ती अर्पण करण्यात आली. तसेच रुद्राभिषेक, कमलार्चन, बिलवार्चन तसेच विविध फुलांचे पुष्पार्चन करण्यात आले.


या सोहळ्यानिमित्त श्रावणमास पूर्णाहुती सोहळा तसेच तीन वर्षांपासून नर्मदेश्वर येथून आणलेल्या ५१ हजार शिवलिंगांची पूर्णाहुती करण्यात आली.
फ्रान्समधील ‘आयर्नमॅन’ स्पर्धेचे विजेते पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांचा कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास, डॉ. तुळशीदास गुट्टे, अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा, डॉ. कुणाल गुप्ते आदी मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Lotus flower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.