दोन दिवसांत १५ बसेसचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:42am

नाशिक : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १५ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे. मंगळवारी ११ गाड्यांना आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केले होते, तर बुधवारी चार बसेसचे नुकसान करण्यात आले. त्यामध्ये आताच महामंडळाच्या ताफ्यात रुजू झालेल्या शिवशाही बसचा समावेश आहे. या घटनेत किती नुकसान झाले याची पडताळणी अद्याप झाली नसल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

नाशिक : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने गेल्या दोन दिवसांत या घटनेत राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण १५ बसेसचे नुकसान झाले. यामध्ये जळगाव आणि नाशिक आगाराच्या बसेसचा समावेश आहे. मंगळवारी ११ गाड्यांना आंदोलनकर्त्यांनी लक्ष्य केले होते, तर बुधवारी चार बसेसचे नुकसान करण्यात आले. त्यामध्ये आताच महामंडळाच्या ताफ्यात रुजू झालेल्या शिवशाही बसचा समावेश आहे. या घटनेत किती नुकसान झाले याची पडताळणी अद्याप झाली नसल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात असंतोष पसरला असून, नाशिकमध्येदेखील अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. समाजबांधवांनी मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविला होता. मंगळवारी दुपारनंतर आंदोलनाला वेगळे वळण लागले आणि अनेक ठिकाणी बसेस तसेच खासगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये प्रवासी तसेच खासगी वाहतूक करणाºया वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे दुपारनंतर लांब पल्ल्याच्या तसेच शहरातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी ११ बसेसचे, तर बुधवारी बंद आंदोलनाच्या काळात शहरात चार बसेसचे नुकसान करण्यात आले. संतप्त आंदोलनकर्त्यांनी द्वारका येथे दोन, तर अमृतधाम येथे एक आणि नवीन बसस्थानकात घुसून शिवशाही बसच्या काचा फोडल्या.

संबंधित

शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने नाशिकमध्ये डॉक्टरचा मृत्यू
ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकीचे काम, सेवानिवृत्तांना संधी; अनोखा उपक्रम
अहमदनगरच्या बहुचर्चित सोनई तिहेरी हत्याकांडाचा सोमवारी निकाल
बॉश स्पेअरपार्ट चोरीप्रकरणी नगरसेवकासह राजकारण्यांची चौकशी
मनोधैर्य योजनेनुसार पिडीत महिलांना आता दहा लाखांची मदत...

नाशिक कडून आणखी

रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद
सुस्तमनपाला फेब्रुवारीपर्यंत डेडलाइन
जिल्ह्यातील वसतिगृहांच्या अधीक्षकांची गुरु वारी बैठक
नवीन प्रशासकीय इमारतीबाबत चर्चा
प्रारुप मतदार यादी आज जाहीर होणार

आणखी वाचा