खामखेडा परिसरातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 07:15 PM2019-07-20T19:15:09+5:302019-07-20T19:16:11+5:30

खामखेडा : देवळा खामखेडा परिसरात शुक्र वारी (दि.१९) झालेल्या पाऊसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Lives of crops in Khamkhheda area | खामखेडा परिसरातील पिकांना जीवदान

खामखेडा परिसरातील पिकांना जीवदान

googlenewsNext
ठळक मुद्देअल्प ओलीवर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमुग, ज्वारी आदि पिकांची पेरणी केली होती.

खामखेडा : देवळा खामखेडा परिसरात शुक्र वारी (दि.१९) झालेल्या पाऊसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चालू वर्षी सुरुवातीपासुन खामखेडा परिसरात पावसाचे अल्प प्रमाण होते. यंदा रोहिणी नक्षत्रात जराही पाऊस झाला नाही. परंतु सुरवातीचे रोहिणी आणि मृग नक्षत्रे कोरडी गेली. आर्द्रा नक्षात्राच्या शेवटच्या चरणात खामखेडा परिसरात अल्पसा पाऊस झाला होता. या अल्प ओलीवर शेतकऱ्याने मका, बाजरी, भुईमुग, ज्वारी आदि पिकांची पेरणी केली होती.
या अल्प ओलीवर पिकांची उगवण झाली. पिके लहान होती. तो पर्यत पिके बºयापैकी येवू लागली होती. पण पाण्या अभावी पिके कोमजू लागली होती. पिके वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट येत की काय? यांची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली होती.
दररोज पावसाचे वातावरण तयार होत होत, आकाशात ढग जमा होत होते. दुपारी ऊन पडत होते. पण पाऊस पडत नव्हता. परंतु शुक्र वारी (दि.१९) सकाळपासून कडक ऊन पडले होते, मात्र चार नंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाचे आभमन झाले. यावेळी चांगलाच बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. अचानक झालेल्या वातावरणामुळे शेतकरी सुखावला आहे. या पावसामळे तुर्त तरी पिकांना जीवदान मिळाले आहे.

Web Title: Lives of crops in Khamkhheda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी