Livelihood robbery jewelery stolen from Nashik Road | नाशिकरोडला भरदिवसा घरफोडीत दागिन्यांची चोरी
नाशिकरोडला भरदिवसा घरफोडीत दागिन्यांची चोरी

नाशिकरोड : जयभवानी रोड येथील भर लोकवस्तीत श्री अर्पण रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भरदिवसा बंद फ्लॅटचे लॅच लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच तोळ्याचे दागिने चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
देवळाली गावातील कैलास मोहन मोरे हे जयभवानी रोड येथील श्री अर्पण रेसिडेन्सीमध्ये पाचव्या मजल्यावर आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मोरे यांच्या पत्नी शुक्रवारी दुपारी ११.३० वाजता देवळालीगावात नणदेला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी मोरे यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश करून बेडरूम व शेजारील खोलीतील, कपाटातील कपडेलत्ते व इतर वस्तुंची उफसरून करून साडेपाच तोळे वजनाचे दागिने चोरून नेले. मोरे यांच्या पत्नी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी आल्या असता त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. ठसे तज्ज्ञ पथकाने घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले.


Web Title: Livelihood robbery jewelery stolen from Nashik Road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.