भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:06 PM2019-04-16T14:06:03+5:302019-04-16T14:06:47+5:30

सुरगाणा : भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यास वनविभागातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र बीटातील वडाळा येथे एका विहिरीत बिबट्या असल्याचे मंगळवारी सकाळी विहिर मालकास निदर्शनास आले.

Livelihood of a leper lying in the well | भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

Next

सुरगाणा : भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यास वनविभागातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र बीटातील वडाळा येथे एका विहिरीत बिबट्या असल्याचे मंगळवारी सकाळी विहिर मालकास निदर्शनास आले. हा बिबट्या एखाद्या भक्षाच्या नादात कथडे नसलेल्या विहिरीत सोमवारी रात्री उशिरा पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कळवण तालुक्यातील वडाळा येथील चिंतामण गांगुर्डे हे सकाळी साडेसात वाजता मोटर चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता विहिरीत बिबट्या असल्याचे त्यांना दिसले. ही वार्ता पसरल्याने या विहिरीजवळ बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच कळवण व कनाशी बीटातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे पथक तत्काळ वडाळा येथे उपस्थित झाले. विहिरीत भरपूर पाणी असल्याने बिबट्या विहिरीत किनारी लगत छोट्याशा जागेवर उभा होता. यावेळी वीज नसल्याने डिझेल इंजिन लावून विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर दोराच्या सहाय्याने पिंजरा आत सोडण्यात आला. या पिंजºयात बिबट्या आल्यानंतर त्याला वर काढण्यात येवून जंगलात सोडून देण्यात आले. बिबट्याला बाहेर काढून जंगलात सोडेपर्यंत जवळपास तीन तास लागले. याकामी वडाळा व परिसरातील ग्रामस्थांनी मोठी मदत केली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सी.आर.कामडी, वनपाल डी.टी. चौधरी, एस.एस. भोये, जयदर, एम.के.बदादे, वनपाल बढे, श्रीमती चौरे, राठोड, गुंजाळ, अहिरे, बिहरम, जाधव, कोंडे, कनाशी बीटातील सर्व वनरक्षक आदी उपस्थित होते.

Web Title: Livelihood of a leper lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक