लक्ष्मीपूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:21 PM2018-11-07T23:21:45+5:302018-11-07T23:22:05+5:30

सिन्नर/ंमालेगाव : ग्रामीण भागात दिवाळी सणानिमित्त चैतन्याचे वातावरण दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी पूजा साहित्यासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसून आली. सायंकाळी शहरातील सराफपेठ व विविध आस्थापनांमध्ये मुहूर्त साधून मनोभावे लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.

Laxmipujan enthusiasm | लक्ष्मीपूजन उत्साहात

लक्ष्मीपूजन उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देदीपोत्सव : आतषबाजीने आसमंत उजाळला

सिन्नर/ंमालेगाव : ग्रामीण भागात दिवाळी सणानिमित्त चैतन्याचे वातावरण दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी पूजा साहित्यासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसून आली. सायंकाळी शहरातील सराफपेठ व विविध आस्थापनांमध्ये मुहूर्त साधून मनोभावे लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.
नोटाबंदी, जीएसटी व वाढती महागाई यावर मात करीत नोकरदार वर्गाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. परतीच्या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची झळ सोसून शेतकरीवर्ग सण उत्साहात साजरा करीत आहे. बुधवारी शहरातील सरस्वतीपूल, गणेशपेठ, वावीवेस, गावठा, बसस्थानक परिसर, शिवाजी चौक आदी भागात झेंडूची फुले व पूजा साहित्य विक्रीसाठी आले होते. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी फुलांची दुकाने लावली होती. लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे बाजारपेठ फुलून गेली होती.
विविध शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाकडे जाण्याची लगबग सुरू आहे. शहरातील व्यापाºयांनी प्रतिष्ठाने व दुकानांमध्ये झेंडूच्या फुलांचे तोरण लावून विधिवत पूजन करीत लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी श्रीलक्ष्मीच्या मूर्तीचा दर हा किमान ७० ते १२५ रुपये प्रतिनग असा होता. लक्ष्मी म्हणून पूजल्या जाणाºया केरसुणीचा दर हा आकारानुसार २५ ते ५० रुपये एवढा होता.
देवीच्या पूजेसाठी आसन, चुनरी, हळदकुंकू, सुपारी, नारळ, अगरबत्ती, वात, कापूर, खारीक, बत्तासे, गुलाब जल आदी सामानाच्या एकत्रित साहित्याची विक्री किमान ४० ते ३५० रुपयांना होत आहे. पणत्या व आकाशकंदिलामुळे रोषणाईचा झगमगाट जाणवत होता. फुलांच्या खरेदीसाठी गर्दी दीपावली सण आणि झेंडूची फुले यांचे नाते अतुट आहे. या सणासाठी घरोघरी आंब्याच्या पानांमध्ये गुंफून झेंडूच्या फुलांच्या माळा व झेंडूच्या फुलांची छोटी छोटी झुडपे घरादारात मांगल्याचे प्रतीक म्हणून लावली जातात. शहरात दसरा-दिवाळी सणानिमित्त तालुक्यातील ग्रामीण भागाव्यतिरिक्त नाशिक, नाशिकरोड, संगमनेर, कोपरगाव व शिर्डी या भागातून मोठ्या प्रमाणात फुले विक्रीस येतात. सरस्वतीपूल भाग झेंडूच्या फुलांच्या बाजारामुळे सजला होता. झेंडूच्या फुलांमध्ये कलकत्ता व गावरान हे दोन प्रमुख प्रकार आहेत. शेवंती, गुलाब व कमळाच्या फुलांना मागणी दिसून आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मागणी अधिक असल्याने लोकांनी फुलांच्या खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली. शहरात ठिकठिकाणी श्रीलक्ष्मीच्या मूर्तीचा दर हा किमान ७० ते १२५ रुपये प्रतिनग असा होता.
लक्ष्मी म्हणून पुजल्या जाणाºया केरसुणीचा दर हा आकारानुसार २५ ते ५० रुपये एवढा होता.
सिन्नरला एटीएम केंद्राबाहेर रांगा दिवाळीच्या खरेदीसाठी चाकरमान्यांची झुंबड उडाली असून, शहरातील एटीएम केंद्राबाहेर रांगा दिसत आहेत. बँकाना लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा अशा सलग दोन दिवस सुट्ट्या असून, शुक्रवारी (दि. ९) रोजी बॅँका सुरू राहतील. पुन्हा शनिवार व रविवारी अशा सलग सुट्ट्यांमुळे एटीएमवर ग्राहकांना व्यवहार पार पाडावे लागणार आहेत. बॅँकांना बुधवारपासून सुट्ट्या असल्याने ग्राहकांचा सर्व ताण एटीएमवर आला आहे. त्यामुळे पैसे शिल्लक असलेल्या एटीएम मशीनवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरातील गणेश पेठ, नाशिकवेस, शिवाजी चौक परिसर गर्दीने फुलून गेला आहे. अनेक नागरिकांची गैरसोय झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Laxmipujan enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक