तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:13 AM2018-03-03T00:13:43+5:302018-03-03T00:13:43+5:30

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.

Launch of work on pond mud removal | तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

Next

येवला : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विखरणी येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच पंचायत समतिी सदस्य मोहन शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.  विखरणी-गोरखनगर मार्गावर असलेल्या तलावातील गाळ या योजनेंतर्गत काढण्यात येणार असून या तलावापासून कानडी शिवारातील तलावापर्यंत सर्व बंधाºयातील गाळ काढण्यात येणार आहे. या तलावातील गाळ शेतकºयांनी आपापल्या शेतजमिनीत टाकल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल असे मत यावेळी कृषी अधिकाºयांनी व्यक्त केले.  या योजनेंतर्गत तीन बंधारा  दुरु स्ती कामे मंजूर असून, एक काम पूर्ण झाले आहे. तर इतर दोन कामे लवकरच सुरू होतील यासोबतच बांध बंधिस्तीची कामेही सुरू राहणार आहेत. यापूर्वी गतवर्षी वसंत बंधारा येथील गाळ काढण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या टप्प्याचे काम आता सुरू करण्यात आले असून, ग्रामस्थांनी या बंधाºयातील गाळ स्वखर्चाने वाहून नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पोयट्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली. या कार्यकमप्रसंगी कृषी अधिकारी राहुल शिंदे, संदीप सोनवर, सरपंच रामदास खुरसने, उपसरपंच विठाबाई पगार, दत्तूू बोळीज, प्रकाश पगार, अशोक कोताडे, वाल्मीक शेलार, म्हसू बिडगर, अरूण खरे, बाजीराव शेळके, सुनील जिरे, नवनाथ गोडसे, अरूण ठोंबरे, तुकाराम शेलार, सागर शेलार, संतोष कोकणे आदी उपस्थित होते.  गावाच्या विकासासोबतच सिंचनासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक असल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभाग आणि शासन यांच्या मदतीने गावात जास्तीतजास्त कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याने जास्तीतजास्त शेतकºयांनी या योजनेचा फायदा शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी मोहन शेलार यांनी उपस्थित शेतकºयांना केले.

Web Title: Launch of work on pond mud removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण