जिल्ह्यात आयुष्यमान योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:39 AM2018-09-25T01:39:03+5:302018-09-25T01:39:47+5:30

केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ आदिवासी भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

 Launch of life plan in the district | जिल्ह्यात आयुष्यमान योजनेचा शुभारंभ

जिल्ह्यात आयुष्यमान योजनेचा शुभारंभ

Next

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ आदिवासी भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील लाभार्थी कुटुंबीयांना महाजन यांच्या हस्ते कार्डाचे वाटपही करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. महाजन पुढे म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खºया अर्थाने देशाच्या सशक्तीकरणाची योजना आहे. ही आतापर्यंतची जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून विम्याची रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार आहे. जिल्ह्णातील ४ लाख ८८ हजार ९ लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ होणार आहे. राज्य शासन सामान्य जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब व्यक्तींना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात आले आहे.  
या योजनेच्या माध्यमातून देशातील ५० कोटी जनतेला ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करणे शक्य होणार आहे. योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी महाजन यांच्या हस्ते रवींद्र बर्वे, दिनेश अहिरे, कादीर शेख, सोमनाथ ताठे, रंजना अहिरे, बाबू बच्छाव, विलास काकुळते आणि योगेश तेलंग यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.
राज्यातील ८३.७२ लक्ष कुटुंबांना सध्याच्या विमा कंपनीमार्फत रुपये दीड लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यावरील ५ लाखापर्यंतचे विमा संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत अ‍ॅश्युरन्स तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच अंगीकृत रुग्णालयांचे रुपये दीड लाख ते ५ लक्ष मर्यादेपर्यंतचे दावे राज्य आरोग्य हमी सोसायटी अदा करील. कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, आमदार नरेंद्र दराडे, नरहरी झिरवाळ, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, आरोग्य उपसंचालक रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिीकत्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ. जयराम कोठारी आदी उपस्थित होते.
विविध वर्गातील कुटुंबांचा समावेश
सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमवती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी ७ वर्गातील कुटुंबाचा तसेच शहरातील कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर आदी ११ वर्गातील कुटुंबांचा योजनेत समावेश आहे.

Web Title:  Launch of life plan in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.