नाशिक : महापालिका व देवळाली कॅम्प क्षेत्रातील उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत चार नियमित फेºया राबविल्यानंतर दोन विशेष फेºया व एक प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, यातूनही काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना अखेरची संधी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत २१ हजार ६६४ प्रवेश झाले आहेत. परंतु अद्यापही सुमारे ४८७ विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चित केलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शेवटची संधी म्हणून दुसºया ‘प्रथम अर्ज प्रथम संधी’ फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेरीत उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शाखा अथवा माध्यम या कारणास्तव प्रवेश रद्द करावयाचा आहे त्यांना प्रवेश रद्द करून २५ सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीतच दुसºया उपलब्ध जागेवर प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात येणार आहे.अंतिम फेरीसाठी रिक्त जागाकला - ७५६
वाणिज्य - ९४३
विज्ञान - ९८४
एचएसव्हीसी - ५३३