लासलगावी कांदा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:40 AM2018-01-11T00:40:53+5:302018-01-11T00:43:02+5:30

लासलगाव : राज्यातील विविध भागांसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढल्याने भावात दररोज घसरण होत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १०) देखील भावात २०० रुपयांनी घसरण झाली. सरासरी २,७५० रुपये भाव मिळाले. पुणे, लोणंद, जळगाव, अहमदनगरसह गुजरातमधील महुआ व भावनगर बाजारपेठेतील नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने राज्यात तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी सोमवार (दि. ८) पासून कांदा भावात दररोज कमालीची घसरण होत आहे.

Lassalgavi Onion dropped | लासलगावी कांदा घसरला

लासलगावी कांदा घसरला

googlenewsNext
ठळक मुद्देदोनशे रुपयांनी घसरण गुजरातमधून आवक वाढल्याचा परिणाम

लासलगाव : राज्यातील विविध भागांसह गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढल्याने भावात दररोज घसरण होत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १०) देखील भावात २०० रुपयांनी घसरण झाली. सरासरी २,७५० रुपये भाव मिळाले. पुणे, लोणंद, जळगाव, अहमदनगरसह गुजरातमधील महुआ व भावनगर बाजारपेठेतील नवीन कांदा बाजारपेठेत दाखल झाल्याने राज्यात तेजीत असलेल्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी सोमवार (दि. ८) पासून कांदा भावात दररोज कमालीची घसरण होत आहे.
बुधवारी सरासरी व कमाल भावात दोनशे रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली. मागील आठवड्यात कांद्याला १५०० ते ३८०० रुपये व सरासरी भाव ३५४० रुपये होता. सोमवारी भाव घसरून ३१०० रुपयांवर आले.
मंगळवार (दि.९) रोजी तर दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन भाव २९०० रुपयापर्यंत गडगडल होते. कांद्याच्या दरात दिवसेदिवस घसरण होत असल्याने उत्पादकात चिंतेचे वातावरण आहे.बाजारपेठेत मागणी कमी, आवक जास्तगेल्या आठवड्यात लासलगाव मुख्य बाजारात लाल कांद्याची १ लाख २८ हजार ५९५ क्विंटल आवक झाली. कांद्याला १००० ते सरासरी ३८०० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला. मात्र देशातंर्गत कांद्याला मागणी कमी झाल्यामुळे भावात घट झाली आहे. त्यातच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह राज्यातील विविध भागातून लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे भावात घसरण होत आहे. दोन महिन्यांपासून भाव वाढले असतांना बळीराजाचे दरवाढीचे समाधान अल्पकाळच टिकले आहे.कमाल आणि सरासरी भावात २०० रूपयांची घसरण कायम आहे. लासलगाव बाजारपेठेत कांदा भावात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकात मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे.कांदा विक्र ी कमी भावाने होऊ लागल्यामुळे आर्थिक अडचणीवर मात कशी करावयाची याचीच शेतकºयात चिंता आहे.
- जयदत्त होळकर, सभापती,
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Lassalgavi Onion dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.