लासलगाव -वाकी- तळेगावरोही मनमाड बस सेवेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:26 PM2019-07-11T18:26:21+5:302019-07-11T18:27:04+5:30

चांदवड तालुक्यतील तळेगावरोही , वाकीखुर्द या भागातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बससेवा नसल्याने त्यांची कुंचबणा होत असून नाशिक ते लासलगाव - वाकी - तळेगांव रोही - मनमाड बस सुरू व्हावी अशा आशयाचे निवेदन नाशिक विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांना भाजपा जिल्हा सरचिटणीस अंबादास केदारे व वाकी सरपंच अरु ण देवढे , तळेगावरोहीच्या सरपंच साधना पाटील यांनी दिले .

Lasalgaon-Waki-Talegaono demand for Manmad bus service | लासलगाव -वाकी- तळेगावरोही मनमाड बस सेवेची मागणी

चांदवड तालुक्यातील लासलगाव - वाकी - तळेगांव रोही - मनमाड बस सुरू होण्याबाबतविभागीय नियत्रंक नितीन मैंद यांना निवेदन देताना भाजपा जिल्हा सरचिटणीस अंबादास केदारे व वाकी सरपंच अरु ण देवढे

Next

चांदवड - चांदवड तालुक्यतील तळेगावरोही , वाकीखुर्द या भागातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बससेवा नसल्याने त्यांची कुंचबणा होत असून नाशिक ते लासलगाव - वाकी - तळेगांव रोही - मनमाड बस सुरू व्हावी अशा आशयाचे निवेदन नाशिक विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांना भाजपा जिल्हा सरचिटणीस अंबादास केदारे व वाकी सरपंच अरु ण देवढे , तळेगावरोहीच्या सरपंच साधना पाटील यांनी दिले .
अंबादास केदारे यांनी चांदवड देवळा विधानसभा आमदार डॉ. राहुल अहेर यांंना विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत सांगीतले त्यांनी तातडीने दखल घेत विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांना भ्रमणध्वनीद्वारे सदरची बस त्वरीत सुरु करावी याबाबत चर्चा केली त्यावर मैंद यांनी लवकरात लवकर बस सुरु करु असे आश्वासन आमदार अहेर व शिष्टमंडळाला दिले आहे.

Web Title: Lasalgaon-Waki-Talegaono demand for Manmad bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.