ड्रायपोर्टसाठी लासलगावला चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:13 PM2018-12-10T17:13:14+5:302018-12-10T17:13:54+5:30

लासलगांव : नाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी लासलगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईवाय एंटरप्राइजेजच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे यांच्या शिष्टमंडळाने लासलगाव मधून होणारी कांदा, मका, भाजीपाला आणि फळे निर्यातीची माहिती घेऊन चाचपणी केली.

Lasalgao Assessment for Driving | ड्रायपोर्टसाठी लासलगावला चाचपणी

ईवाय एंटरप्राइजेजच्या प्रतिनिधीना माहिती देतांना सभापती जयदत्त होळकर, संदीप दरेकर, कांदा निर्यातदार नितीन जैन, ओमप्रकाश राका आदी.

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून पुढाकार

लासलगांव : नाशिक जिल्ह्यात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी लासलगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईवाय एंटरप्राइजेजच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे यांच्या शिष्टमंडळाने लासलगाव मधून होणारी कांदा, मका, भाजीपाला आणि फळे निर्यातीची माहिती घेऊन चाचपणी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रु पये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. सुरु वातीला निफाडमध्ये हा या ड्रायपोर्ट होणार होता. मात्र जेएनपीटीच्या माध्यमातून ईवाय एंटरप्राइजेज लासलगांव मध्ये सोमवारी पाहणी करण्यात आली.
कांद्यासाठी आशिया खंडातील प्रथम क्र मांकाची बाजारपेठ म्हणून लासलगाव ओळखले जाते. कांद्याबरोबरच, डाळिंब, टोमेटो, भाजीपाला मका आणि भुसार मालासाठी लासलगांव अग्रेसर आहे. कांदा, आंबा, डाळी, मसाले यासह अनेक पिकांवर विकिरण प्रक्रि या लासलगांव येथील केन्द्रामध्ये केली जाते. दरवर्षी लासलगाव मधून आॅस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, गल्फकंट्री आदी ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात केला जातो. लासलगांव शहरामध्ये मध्य रेल्वेची सुविधा असून या रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कांदा पाठविला जातो. त्यामुळे लासलगाव मध्ये जर या ड्रायपोर्टची सुविधा सुरू करण्यात आली तर याचा पिंपळगाव बसवंत, निफाड, चांदवड, मनमाड, उमराणे, झोडगे, धुळे येथील बाजार समिती घटकाना फायदा होणार आहे.
यावेळी बाजार समिती सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर, सचिव बी. वाय. होळकर, कांदा निर्यातदार नितिन जैन, ओमप्रकाश राका, मनोज जैन, ऋृषभ राका, सागर जैन, राजाराम सांगळे, संजय सांगळे, वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर, दाणा व्यापारी
रुपेश चोरिडया, मुख्य लेखापाल नरेंद्र वाढवणे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Lasalgao Assessment for Driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी