भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:02 AM2018-10-15T01:02:59+5:302018-10-15T01:03:24+5:30

समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

Language, provincialism only narrow feeling | भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

Next
ठळक मुद्देभय्याजी जोशी : अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, निशिकांत अहेर, नानासाहेब जाधव, स्मृतिग्रंथ समितीचे कैलासनाना साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जोशी म्हणाले, संघाचा विचार हा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा आहे.

भाषा, प्रांतवाद समाजाला संकुचित करीत असल्यामुळे समाजातील ही विषमता दूर करण्याचे काम संघ समरसतेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाषा, प्रांत हा काही अल्प आणि बहुमताचा विषय नाही तर समरसता आचरणाचा विषय असल्याचे जोशी म्हणाले. हिंदुत्व हे एक सत्य असल्यामुळे सत्य सिद्ध करण्याला बहुमत लागत नाही. त्यामुळे धर्मांतरीत करून हिंदूंची संख्या वाढविण्याची गरज नसल्याचे विधानही त्यांनी केले.
हिंदुत्व ही समर्पण आणि समरसता असून हा विचार संघाच्या असंख्य ज्येष्ठांनी रूजविला आहे. त्याच पाऊलखुणांवर संघाची पुढची पिढी साधना करीत आहे. आपसातील मतभेद विसरून उभे राहिलो तरच आपण जगात स्थान निर्माण करू शकतो, असा पुनरुच्चार करताना जोशी यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या हिंदुत्व विचाराचे पोषण राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे सांगितले. हिंदुत्व विचाराचे आणि चिंतनाचे पोषण झाले नाही तर हा विचारच दुर्बल होऊन जाईल, असेही ते म्हणाले.
हिंदुत्व म्हणजे समर्पण
हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक समर्पणाची भावना आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा हा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. जो सर्वांना बरोबर घेऊन चालेल तोच जगावर वर्चस्व राखू शकतो. आम्ही कोण तर आम्ही अमुकअमुक आहोत ही समरतसेची भावना नाही तर सर्वांबरोबर घेण्याचा विचार आहे. समरतेविषयी आज कुणीही बोलू शकतो. परंतु समरसता ही आचरणातून अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.

Web Title: Language, provincialism only narrow feeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.