मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:47 AM2018-11-22T00:47:11+5:302018-11-22T00:47:41+5:30

गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे.

 Labors in laborers Contrast results in farming | मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

मजूर-शेतकऱ्यांमधील वादाने शेतीकामावर विपरीत परिणाम

Next

गंगापूर : गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या प्रयत्नामुळे मजूरवर्ग शेतीच्या कामाला वाळू लागला आहे. परंतु त्याला मिळत असलेला प्रतिसाद व दोन्ही बाजूंकडून घेतली जाणाºया ताठर भूमिकेमुळे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी स्वत:च गावोगावी जाऊन मजूर व शेतकºयांच्या मनातील गैरसमज, भीती दूर करणार आहेत.
गिरणारे परिसरातील शेतकरी व धोंडेगावाकडून येणाºया एका शेतमजूर व शेतकरीमध्ये किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान मारहाणीत झाल्याने चिडलेल्या शेतमजुराने ही घटना आपल्या सहकाºयांना सांगून त्याचे रूपांतर वादात झाले होते. मात्र पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, सरपंच, दोन्ही बाजूकडील ग्रामस्थ, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने सर्ववातावरण शांत होत असताना काही समाजकंटक त्याला वेगळे वळण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना व वेगवेगळ्या मार्गाने वाद वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जाणून खुद्द तहसीलदार व त्यांच्या पथकाने सकाळी पहाटे ५ वाजता त्या भागाचा दौरा करून त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. गिरणारे पंचक्रोशीतील शेतमजूर व शेतकºयांनी आपसातील मतभेद विसरून पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे. मजुरांच्या असहकारामुळे शेतकºयांनी आपल्या घरातील सर्व मंडळींना कामावर लावून शेतातली कामे करून घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनही मजुराच्या मनातील भीती गेली नसल्याने लवकरच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मजुरांच्या गावो गावी जाऊन त्यांची समजूत घातली जाणार असल्याचे नाशिकचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सांगितले.
शेतक-यांचे नुकसान टळले
विशेष करून टमाट्याचे खूड करून होणारे नुकसान टाळले आहे. ज्या शेतकºयाकडे बागाईत क्षेत्र जास्त त्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील इतर भागातून मजूर आणून आपले काम उरकते केले आहे, तर दुसºया बाजूला काही मजुरांकडे घरची शेती असल्याने त्यांनी वातावरण शांत होईपर्यंत काम सुरू केले आहे. त्यामुळे पूर्वी गाड्या भरून येणाºया मजूर आता एकटे दुकटे एसटी बस अथवा दुचाकीने शेतक-याकडे कामाला येत आहेत.
धोंडेगावच्या झालेल्या बैठकीत मजुरांनी दोन दिवसांनंतर कामावर येण्यास सांगितले होते मात्र दोन दिवस होऊनही मजूर कामावर आले नाही त्यामुळे आता गावोगावी जाऊन मजुरांना कामावर येण्याचे आवाहन करणार आहे.
- शिवकुमार आवळकंठे, तहसीलदार

Web Title:  Labors in laborers Contrast results in farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.