औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना केव्हीएएच बिलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:26 AM2019-05-15T01:26:20+5:302019-05-15T01:27:18+5:30

महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव्हाण यांनी केले.

KVAH billing for industrial, business customers | औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना केव्हीएएच बिलिंग

औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांना केव्हीएएच बिलिंग

Next

सातपूर : महावितरण कंपनीने औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना दि.१ एप्रिलपासून केडब्ल्यूएच बिलिंगऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली अमलात आणण्याचे निश्चित केले असून, ग्राहकांनी या प्रणालीनुसार आवश्यक ते बदल करून घ्यावेत, असे आवाहन महावितरणचे वाणिज्य संचालक सतीश चव्हाण यांनी केले.
सातपूर येथील नाईस सभागृहात केव्हीएएच बिलिंग प्रणाली या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, दि. १२ सप्टेंबर २०१८ पासून वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसार औद्योगिक बिलात बदल करून पॉवर फॅक्टरमध्ये दंड व सवलत दिली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असल्याने वीज नियामक आयोगाने जानेवारीत आदेश काढून दि.१ एप्रिल २०१८ पासून वीज बिलातून पॉवर फॅक्टर काढून नवीन केव्हीएएच प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार दि. १ एप्रिल २०२० पासून ही प्रणाली अमलात येणार आहे. या नवीन प्रणालीची २० किलोवॅटपेक्षा अधिक विद्युतभार असलेल्या सर्व उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरणकडून ठिकठिकाणी चर्चासत्रांचे आयोजन केले जात आहे.
या प्रणालीविषयी निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, महाराष्ट्र चेंबर ऊर्जा समितीचे मिलिंद राजपूत, निमा ऊर्जा समितीचे रावसाहेब रकिबे, बबनराव चौरे, व्यंकटेश मूर्ती, रमेश पवार, निवृत्ती गांगुर्डे आदींसह उपस्थित ग्राहकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले, तर काही ग्राहकांनी सूचनादेखील केल्यात. यावेळी व्यासपीठावर मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली आदी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता एस.सवइराम यांनी आभार मानले. यावेळी निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर, नाईस आदींसह विविध कारखान्यांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: KVAH billing for industrial, business customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.