नाशिकसह देशातील कुंभमेळा आता जागतिक वारसायुनेस्कोच्या यादीत समावेश : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा

ठळक मुद्दे नाशिकसह देशातील कुंभमेळा आता जागतिक वारसायुनेस्कोच्या यादीत समावेश : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून घोषणा

नाशिक : देशातील सिंहस्थ कुंभमेळ्याला युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले असून, यामुळे भारतातील कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणार आहे. कुंभमेळ्याचे संवर्धन आणि त्यासाठी कराव्या लागणाºया उपायोजना युनेस्को करणार असून, जागतिक वारसा म्हणून कुंभमेळा ओळखला जाणार आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेला भारतातील कुंभमेळा आता ग्लोबल होणार असून, युनोच्या मदतीमुळे कुंभमेळ्याला जागतिक उत्सवामध्ये स्थान मिळणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील दोन वर्षांपासून केंद्राकडे यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत होता. दोन वर्षांनंतर पाठपुराव्याला यश मिळाले असून, आता यापुढे सिंहस्थ कुंभमेळा जागतिक पातळीवर साजरा होणारा उत्सव म्हणून ओळखला जाणार असल्याचे खासदार गोडसे म्हणाले.
केंद्रीय समितीपुढे सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भातील आवश्यक असणारे ग्रंथ, साहित्य, छायाचित्रे व व्हिडीओ क्लिप्स पुरावा म्हणून दाखल करण्यात आला होता. केंद्राने नाशिक सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाची पाहणी करणाºया समितीच्या पुराव्याच्या आधारे पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे युनेस्कोने नाशिक सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाला आंतरराष्टÑीय स्वरूपाचा दर्जा बहाल केला आहे.
सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने नाशिकला सांस्कृतिक क्षेत्रात यापुढे जागतिक स्तरावर नावलौकिक मिळणार आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची दखल युनेस्को घेणार असून, कुंभमेळ्यासाठी आवश्यक असणारी उपाययोजना व संवर्धन युनेस्को करणार आहे. आंतरराष्टÑीय दर्जामुळे संपूर्ण जगातील सांस्कृतिक क्षेत्रात नाशिकला सन्मान मिळणार आहे.
-हेमंत गोडसे,खासदारकेंद्राने सादर केला होता प्रस्तावसिंहस्थ कुंभमेळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशातील अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार याप्रमाणे नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा साजरा होत असतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संस्थानचे विश्वस्त ललिता शिंदे यांनी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा या उत्सवाला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करावे, अशी सूचना खासदार गोडसे यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांच्याकडे पाठपुरावा करून आग्रह धरला होता. केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाची एक समिती नेमून यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. केंद्राने पॅरिस येथील युनेस्कोच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्याप्रमाणे युनेस्कोने सिंहस्थ कुंभमेळा उत्सवाला आंतरराष्टÑीय स्वरूपाचा दर्जा बहाल केला आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.