गार्डस ड्रील स्पर्धेत नाशिकमधील केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 01:11 PM2017-12-31T13:11:32+5:302017-12-31T13:21:04+5:30

केटीएचएम महाविद्यालयातील एनएनसीसी पथकाने गार्डस् पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाया वन महाराष्ट्र बटालीयनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्डस ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलींच्या एनसीसी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला

KHM's NCC team topper in Nasik | गार्डस ड्रील स्पर्धेत नाशिकमधील केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल

गार्डस ड्रील स्पर्धेत नाशिकमधील केटीएचएमचे एनसीसी पथक अव्वल

Next
ठळक मुद्देकेटीएचएमच्या गर्ल्स एनएनसीसी पथकाने पटकावला प्रथम क्रमांक एनसीसी पथकाची केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर गार्डस ड्रील स्पर्धा पिंपळगाव बसवंतच्या के के वाघ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक

नाशिक : नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयातील एनएनसीसी गार्डस् पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई अंतर्गत कार्यरत असणाऱ्या वन महाराष्ट्र बटालीयनमधील नाशिक विभागातील गर्ल्स एनसीसी पथकाची गार्डस ड्रील स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेत केटीएचएम महाविद्यालयातील मुलींच्या एनसीसी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
लष्करी अधिकाऱ्यांना सन्मान प्रदान करण्यासाठी शस्त्रधारी गार्डस ऑफ ऑनर दिला जातो. गार्डस ऑफ ऑनर पथकात एक संत्री (पहारेकरी), एक गार्ड कमांडर व सहा छात्र असे एकूण आठ शस्त्रधारी छात्रंचा समावेश असतो. या गार्ड्स ड्रीलची स्पर्धा मुंबई बी ग्रुप अंतर्गत येणाऱ्या नाशिक विभागाची स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयात व मुंबई विभागाची स्पर्धा मुंबई येथे एकाच वेळी पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण मुंबई ह्यबीह्ण ग्रुप मधून केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसी मुलींच्या पथकाने प्रथम क्र मांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक के के वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व मुंबई येथील महाराष्ट्र महाविद्यालयाने तृतीय क्र मांक पटकावला. या स्पर्धेसाठी 1 महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथक, मुंबई येथील सुभेदार सी. विश्वनाथ, सुभेदार मदन पाल, सी.एच.एम. देवरे उपस्थित होते. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या रायफल 7 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना पथकाने पुरविल्या होत्या. या माध्यमातून नाशिक विभागात 7 महाराष्ट्र बटालीयनडे डेमो रायफल उपलब्ध असल्या तरी मुलींच्या 1 महाराष्ट्र बटालीयनकडे संचलनाच्या सरावासाठी मात्र रायफल उपलब्ध नसल्याची पुन्हा एकदा समोर आले आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या छात्रंना एनसीसी अधिकारी शैला मेंगाणो, लेफ्टनंट जयश्री कुशारे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: KHM's NCC team topper in Nasik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.