खामखेडा आरोग्य केंद्र कायाकल्पमध्ये सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:49 PM2019-05-09T18:49:01+5:302019-05-09T18:49:38+5:30

पुरस्कार जाहीर : दोन लाख रु पयांसह मानचिन्ह

Khamkheda Health Center Rejuvenation Best | खामखेडा आरोग्य केंद्र कायाकल्पमध्ये सर्वोत्कृष्ट

खामखेडा आरोग्य केंद्र कायाकल्पमध्ये सर्वोत्कृष्ट

googlenewsNext
ठळक मुद्दे देवळा तालुक्यातील खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने सहभागी होऊन ९५.०३ टक्के गुण मिळविल्याने त्यास कायाकल्पचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प स्पर्धेअंतर्गत राज्यपातळीवर प्रथम क्र मांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये विविध योजना राबविण्यात येतात. या आरोग्य योजनांची माहिती व सेवा रु ग्णांपर्यत नेऊन पोहोचवून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आरोग्य केंद्राना राज्य पातळीवर कायाकल्प पुरस्कार देण्यात येतो. गावखेड्यातरु ग्णसेवा देतांना आरोग्य केंद्रात सर्वप्रकारच्याअभिलेखांचे दस्तावेजीकरण , लाभार्थीना उत्कृष्ट सेवासुविधा, दवाखान्यातील बाह्य व अंतर्गत स्वच्छता याबाबींची पडताळणी करुन हा कायाकल्प पुरस्कार देण्यात येतो.
या कायाकल्प पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून प्रस्ताव मागविण्यात येतात. पुरस्कार समितीमार्फत तपासणी व पाहणी करण्यात येऊन गुणांकन देण्यात येते. त्यात देवळा तालुक्यातील खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने सहभागी होऊन ९५.०३ टक्के गुण मिळविल्याने त्यास कायाकल्पचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात दोन लाख रु पये, कायाकल्पचे मानचिन्ह व प्रशस्तिपत्राचा समावेश आहे.

आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र

खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने आता पर्यत डॉ. आनंदबाई जोशी प्रथम व द्वितीय पुरस्कार तसेच नाशिक जिल्ह्यातील ९००१-२००८ हे मानांकन मिळवणारे पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र ठरण्याचा मान मिळवला आहे. खाजगी दवाखान्यांना लाजवेल अशा सुुविधा मिळू लागल्यामुळे व आदर्शवत कामकाजामुळे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.
- डॉ. रवींद्र खैरनार, वैद्यकीय अधिकारी, खामखेडा

Web Title: Khamkheda Health Center Rejuvenation Best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.