लासलगावात कांदा हब निर्माण केलं जाईल, कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 02:10 PM2017-08-24T14:10:32+5:302017-08-24T14:10:35+5:30

कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही तसेच लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी नाशिकमध्ये केली.

Katha hub will be constructed in Lasagla, Agriculture Minister Sadabhau Khot's announcement will be made | लासलगावात कांदा हब निर्माण केलं जाईल, कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा

लासलगावात कांदा हब निर्माण केलं जाईल, कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा

Next

लासलगाव (नाशिक), दि. 24 -  कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नाही तसेच लासलगाव येथे कांदा हब निर्माण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी केली. लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने विंचूर येथे कांदा लिलावाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. राज्याचे कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल,  आमदार अनिल कदम तसेच लासलगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्यासह संचालकही यावेळी उपस्थित होते.

यावेळी खोत असेही म्हणाले की, ''कांदा साठवणूक चाळीच्या निधीत भरघोस वाढ केली आहे. तसेच 35  लाख मेट्रिक टनाची  होणारी आयात कमी करून ती 2 लाख टनावर आणली आहे. मी शेतकरी चळवळीतील  कार्यकर्ता आहे. त्यामुळेच  सत्तेत शेतकर्‍यांचा समस्येवर  आपण जागरूकतेने काम करत आहोत. लासलगाव येथे कांदा हब घोषित करीत असून त्याकरता या आठवड्यात एक बैठक होईल. मोठ्या प्रमाणावर गोदाम तसेच रेल्वे सुविधांवर भर दिला जाईल''.
कांदा प्रश्नावर काहीही झाले तर मी कांदा उत्पादकांसाठी  मी स्वतः येऊन नाशिक जिल्ह्यात आंदोलन करेन हा शब्द देतो, असेदेखील ते म्हणालेत. सर्व शेतकर्‍यांचे माझ्यावर विश्वास आहे, त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही, असेही सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांना आश्वासन दिले केले. लासलगाव कृषी उत्पन्न  बाजार  समिती ही आशियाख॔डाची समिती आहे तिला वैभव मिळवून  देण्यासाठी  प्रयत्न  करू असेही ते म्हणालेत.
 

Web Title: Katha hub will be constructed in Lasagla, Agriculture Minister Sadabhau Khot's announcement will be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी