...म्हणून काश्मीर भारताच्या नकाशावर : विनायक आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:55 AM2019-05-22T00:55:17+5:302019-05-22T00:56:22+5:30

पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.

 ... as on Kashmir map of India: Vinayak Agashey | ...म्हणून काश्मीर भारताच्या नकाशावर : विनायक आगाशे

...म्हणून काश्मीर भारताच्या नकाशावर : विनायक आगाशे

Next

नाशिक : पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करत काश्मीरच्या विमानतळापर्यंत घूसखोरी केली होती. यावेळी मेजर सोमनाथ शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या ७० शूरवीरांच्या तुकडीने १९४७ साली चिवट लढा देत पाकिस्तानी सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढले, म्हणून आज भारताच्या नकाशावर काश्मीर झळकत असल्याचे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.
गोदाघाटावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे २१वे पुष्प आगाशे यांनी मंगळवारी (दि.२१) ‘सैनिकाच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग’ या विषयावर गुंफले. भारतीय सैन्यदलातील शूरवीर पराक्रमी अशा हुतात्म्यांच्या शौर्यकथांचे त्यांनी विवेचन केले. यावेळी आगाशे म्हणाले, काश्मीरच्या संरक्षणासाठी शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या जवानांनी दिलेले बलिदान अविस्मरणीय असेच आहे. शर्मा जेव्हा आपल्या ७० जवानांच्या मदतीसाठी धावले तेव्हा ते रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसेच लेफ्टनंट क र्नल प्रीती चांद यांनी लडाखसारख्या प्रतिकूल वातावरणाच्या प्रदेशात केवळ १८ जवान २०० रायफल घेऊन पाकिस्तानी सैन्यांचा सामना केला. त्यांना महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले. चांद यांची शौर्यकथाही भारतीय सेनेच्या इतिहासात उल्लेखनीय अशीच असल्याचे आगाशे म्हणाले. भारतीय सेनेत लढणारे सैनिक म्हणून नव्हे तर सपोर्ट स्टाफमध्ये असलेले बूट दुरुस्ती करणारे कारागीर हवालदार सियाराम यांनीही देशसेवा करताना आपल्या ‘शुटिंग’च्या कौशल्याचा अचूक वापर करत भारतीय सेनेला गरज पडली तेव्हा हातात बंदूक घेऊन शत्रूला धडा शिकविला. त्यांची शौर्यगाथाही प्रेरणादायी अशीच असल्याचे त्यांनी सांगितले.
सैनिकाचे जीवन सर्वसामान्य माणसापेक्षा कितीतरी पटीने वेगळे असते. सैनिक देशाच्या सीमांचे रक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून आपले कुटुंब, कौटुंबिक भावना, सुख-चैन अशा सर्व गोष्टी विसरून केवळ देशप्रेमाखातर देशसेवेचे व्रत घेत सैनिकी धर्म निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. भारतीय सेनेच्या इतिहासात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अशा अनेक शूरवीरांच्या शौर्यगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या असल्याचे आगाशे यांनी यावेळी अधोरेखित केले.
आजचे व्याख्यान
वक्ते : कवी संदीप जगताप
विषय : शिवशाही ते लोकशाही

Web Title:  ... as on Kashmir map of India: Vinayak Agashey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.