झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या करकोच्याला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:36 AM2018-03-26T00:36:18+5:302018-03-26T00:36:18+5:30

 Karka got trapped in a mud trap on tree | झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या करकोच्याला मिळाले जीवदान

झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या करकोच्याला मिळाले जीवदान

Next

इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या करकोचा पक्ष्याची सुखरूप सुटका करण्यात यश आले. सकाळच्या वॉकला निघालेल्या मोटकरी दाम्पत्याला त्यांच्या बंगल्यासमोरील निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या मांजाला पक्षी अडकलेला आढळून आला. पक्ष्याची केविलवाणी तडफड पाडून त्यांनी तत्काळ १०० नंबरवर फोन करून घटना कळवली. सिडको अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ घटनास्थळ गाठले. या पक्ष्याला कर्मचाºयांनी योजना आखत प्रयत्न करून सुखरूप खाली आणले. त्याच्या शरीरावरील जखमा पाहता उपचारासाठी त्याला पक्षीमित्राकडे सोपवण्यात आले. करकोचा पक्ष्याची जोडी या भागात अनेक दिवसांपासून वास्तव्यास आहे. सकाळ-सायंकाळ तिचे परिसरात भ्रमण सुरू असते. जोडीतील एक पक्षी नेहमीप्रमाणे उडण्यात यशस्वी झाला तर दुसरा पक्षी मात्र झाडावरील मांजात अडकला.

Web Title:  Karka got trapped in a mud trap on tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर