कळवण तालुका : दुष्काळ सवलत देण्यात ना‘पास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:13 PM2019-01-05T23:13:41+5:302019-01-05T23:13:57+5:30

कळवण : यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या बळीराजाच्या मुलांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील २६०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाससाठीचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळाने सर्व विभागांना दिले आहेत.

Kalwan Taluka: Drought Relief | कळवण तालुका : दुष्काळ सवलत देण्यात ना‘पास’

कळवण तालुका : दुष्काळ सवलत देण्यात ना‘पास’

Next
ठळक मुद्देमहामंडळाला आली जाग६७ गावांतील २६०० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पास

कळवण : यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या बळीराजाच्या मुलांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील २६०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पाससाठीचा आर्थिक भार कमी होणार आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळाने सर्व विभागांना दिले आहेत.
दुष्काळाची झळा बसलेल्या तालुक्यातील कळवणसह नवी बेज व मोकभणगी मंडळातील गावे राज्य सरकारकडून दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थिती दिलासा देण्यासाठी शासनाकडून तालुक्यातील
नियमित पासधारक विद्यार्थ्यांना एसटीने मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार हे पास वितरित होणे अपेक्षित होते. मात्र विहित नमुन्यातील पासेस एसटी प्रशासनाकडून आगारास प्राप्त झाले नसल्याने दुष्काळ सवलत देण्यातदेखील सरकारकडून दिरंगाई केली जात होती.
राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक पासमध्ये ६६.६७ टक्के सवलत देऊन उर्वरित ३३.३३ टक्के रक्कम विद्यार्थी अदा करीत असतात. या राज्य महामंडळाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या गावांमधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभकळवण तालुक्यातील कळवण, बेज व मोकभणगी या मंडलांचा त्यात समावेश आहे. कळवण मंडलातील कळवण बुद्रुक, कळवण खुर्द, मानूर, ओतूर, मुळाणे वणी, वडाळे वणी, नरूळ, मेहदर कुंडाणे (ओ.), गोबापूर, आठंबे, पाळे पिंपरी, मार्कंड पिंप्री, जिरवाडे (ओ.), माची धोडप, कन्हेरवाडी, साकोरे, साकोरेपाडे, सादडविहीर, कातळगाव, बेज मंडळातील नवी बेज, जुनी बेज, पिळकोस, भादवण, विसापूर, चाचेर गांगवण, बिजोरे, भेंडी, बगडू, निवाणे, नाकोडे, पाटविहीर, एकलहरे, भुसणी, दह्याणे, शिरसमणी तर मोकभणगी मंडळातील मोकभणगी, ककाणे, खेडगाव, रवळजी, देसराणे, इन्शी, नाळीद, भांडणे, पाडगण, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, भांडणे (पिं.), सावरपाडा, शेरी भैताणे, शेरी (दि.), काठरेदिगर, गणोरे, दह्याणे, हुंड्यामोख, मळगाव खुर्द, मळगाव बु., सिद्धार्थनगर, सुपले दिगर, प्रतापनगर, खर्डे दिगर, पुनंदनगर, उंबरदे, दरेभणगी,धनेर, धार्डे दिगर, मोहबारी या ६७ गावांमधील २६००हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत पास मिळणार आहे.

Web Title: Kalwan Taluka: Drought Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.