अवघ्या नऊ महिन्यांत तुकाराम मुंढे पर्वाची अखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:22 AM2018-11-22T01:22:45+5:302018-11-22T01:23:03+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्त आणि कायदेशीर कामकाजाविषयी सर्वसामान्य सुखावत असले तरी त्यांची निर्णय आणि कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत गेल्याने त्यांचे चांगले निर्णय झाकोळत गेले.

 In just nine months, Tukaram Mundhe is in the middle | अवघ्या नऊ महिन्यांत तुकाराम मुंढे पर्वाची अखेर

अवघ्या नऊ महिन्यांत तुकाराम मुंढे पर्वाची अखेर

Next

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्त आणि कायदेशीर कामकाजाविषयी सर्वसामान्य सुखावत असले तरी त्यांची निर्णय आणि कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत गेल्याने त्यांचे चांगले निर्णय झाकोळत गेले. विशेषत: लोकनियुक्त संस्था असताना सत्तारूढ भाजपालाच डावलले जात असल्याने सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशी अवस्था नगरसेवकांची झाली. त्यातून मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यास परावृत्त करण्यात आल्यानंतर आयुक्तांच्या वादग्रस्त निर्णयामुळे लोकरोषाचा सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला फटका बसल्यास जबाबदार धरू नका, असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंढे यांच्या बदलीचा निर्णय घ्यावा लागल्याचे वृत्त आहे.  राज्यशासनाच्या निर्णयामुळे नाशिक महापालिकेत मुंढे पर्वाची नऊ महिन्यात अखेर झाली आहे.
नवी मुंबई आणि पीएमटी येथे वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंढे हे नाशिकमध्ये फेब्रुवारी महिन्यात नाशिक महापालिकेत आल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच दणका देण्यास सुरुवात केली. नगरसेवकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अडीचशे कोटी रुपयांच्या रस्त्याचा विषय रद्द करण्यात आल्याने वादाची ठिणगी पडली. करवाढ करण्यासाठी महासभेत त्यांनी भाजपाला भाग पाडले. नंतर सत्तारूढ गटाने चूक दुरुस्त करून १८ टक्के करवाढ केली खरी; परंतु त्यानंतर मात्र सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांचे व त्यांचे खटके पडणे नित्याचेच झाले. यापूर्वीच्या आयुक्तांनी मंजूर केलेले आणि अगदी वर्कआॅर्डर काढण्याच्या कार्यवाहीत आलेली अनेक कामे आयुक्तांनी रद्द केली. नगरसेवकांनी सुचवलेली कामे रद्द करण्यात आली तसेच नगरसेवक निधी रद्द करण्यात आल्यानेदेखील वाद वाढत गेला. शहरात काम करताना नागरिकांच्या गरजेनुसार करावी लागत असली तरी आयुक्तांनी मात्र त्यासाठी नियम दाखवले आणि त्याचप्रमाणे कामाचे प्राधान्य, तांत्रिक व्यवहार्यता तसेच निधीची तरतूद अशा त्रिसूत्रीला प्राधान्य दिले. त्यामुळेदेखील नगरसेवकांची नाराजी ओढवून घेतली. वार्षिक भाडेमूल्यात वाढ करण्याचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला आणि त्यामुळे तर शहरात शेतकऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात मेळावे घेतले. त्यात भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांनादेखील सहभागी व्हावे लागले. महासभेने संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेऊनही त्याची अंमलबजावणी आयुक्तांनी केली नाही. तर ५० टक्के दर कमी केले. करवाढीमुळे शहर उद्ध्वस्त होईल, असा आरोप मुंढे यांच्यावर झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने मुंढे यांच्याविषयी तक्रारी करण्यात आल्या. परंतु फडणवीस यांनी कधी भाजपाच्या पदाधिकाºयांना तर कधी तुकाराम मुंढे यांना सबुरीचा सल्ला देत वेळ काढला. अखेरीस भाजपाच्या आमदारांसह सर्वच पदाधिकाºयांनी लोकांची कामे होत नसतील आणि आयुक्त अप्रिय निर्णय घेत असतील तर पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेदेखील मध्यंतरी कळविल्यानंतर मुंढे यांच्या बदलीच्या हालचाली गतिमान झाल्या आणि अखेरीस मुंढे यांच्या बदलीची फाईल फिरवणे सुरू झाले. मुंढे यांच्या ऐवजी नाशिकच्या आयुक्तपदासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी तसेच शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नावाची चर्चा होती. तथापि अखेरीस राधाकृष्ण गमे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.
बदलीच्या चर्चेने वातावरण ढवळले
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविषयी यापूर्वीपासूनच चर्चा सुरू होती. ईदची सुटी असतानाच आयुक्तांची बदलीची वार्ता शहरात वाºयासारखी पसरली आणि त्यातून सोशल मीडियावर भरभरून मत प्रदशर््िात केले जाऊ लागले. त्यात संमिश्र मते व्यक्त करण्यात आली.
आयुक्तांची बदली कोणी केली?
महापालिका आयुक्तांची बदली कोणी केली यावरूनही आता श्रेय आणि अपश्रेयाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीनेदेखील तुकाराम मुंढे यांची हुकूमशाही आणि मनमानी बघता बदली करावी, अशी मागणी केली होती, त्यानुसार कार्यवाही झाल्याचे समितीने म्हटले आहे.
मुंढे यांच्या बदलीबाबत भाजपाचे मौन
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर शहरात जोरदार उलटसुलट चर्चा सुरू असतानाच सत्तारूढ भाजपाने मात्र मौन बाळगले आहे. मुंढे यांना बदलीपत्र प्राप्त झाल्यानंतरच भूमिका मांडू, असे पदाधिकाºयांनी सांगितले.मुंढे आणि सत्तारूढ भाजपा यांचे सूर सुरुवातीपासूनच जुळत नव्हते त्या पार्श्वभूमीवर मुंढे यांच्या विरोधात पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. अखेरीस नऊ महिन्यांतच मुंढे यांची बदली झाली. तथापि, याबाबत महापालिकेतील भाजपा पदाधिकाºयांनी मौन बाळगले.
गुरुवारी (दि.२२) याबाबत पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका स्पष्ट करू, असे पदाधिकाºयांनी सांगितले.
या कार्यपद्धतीमुळे अडचणीत
लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच निर्णय
प्रत्येक कामाला त्रिसूत्री, नगरसेवकांच्या कामाला कात्री
आमदार निधीचा वापर स्वेच्छेने करण्यास मनाई
वार्षिक भाडेमूल्यात वाढ केल्याने घरपट्टीचा वाढला बोजा
राजकीय नेते, आमदारांनी घेतलेल्या मनपाच्या मिळकती सील किंवा बाजारमूल्याप्रमाणे भाडे आकारणी
१३४ आंगणवाड्या बंद, मानधनावरील कर्मचारी हटविले
बस सेवेसाठी परिवहन समितीऐवजी कंपनी
मखमलाबाद येथे नगर रचना योजना राबविण्यास शेतकºयांचा विरोध
सिडकोत अतिक्रमण हटविण्याची भूमिका (न्यायालयामुळे माघार)
गणेश उत्सवासाठी भालेकर मैदान नाकारणे
संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याला सुविधा नाकारणे
अधिकाºयांचे निलंबन, चौकशा आणि बडतर्फी
बेकायदेशीर बांधकाम करणाºया मिळकतींचा शोध
कालिदास कलामंदिराची भाडेवाढ
अन्य मनपा आणि शासकीय सेवेतील अधिकारी नियुक्त करणे
गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणात न्यायालय अवमान प्रकरण
अभियंता रवि पाटील यांचे बेपत्ता होणे तसेच सहायक अधीक्षक धारणकर यांची आत्महत्या
लोकाहिताचे हे घेतले धाडसी निर्णय
ई कनेक्ट अ‍ॅपमुळे नागरी समस्यांची तत्काळ सोडवणूक
नागरिकांची गरज बघूनच कामांचा निर्णय
तक्रारींच्या सोडवणूकीसाठी वॉक विथ कमिश्नरचा उपक्रम
महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ, ११८ कोटी रुपयांची एकरकमी परतफेड
घरपट्टी थकविणाºया बड्या धेंडांना आणि संस्थांना दणका
शहरात समान पाणीपुरवठ्यासाठी प्रथमच जलवाहिन्यांची ऐतिहासिक कामे
मलवाहिकांची मोठ्या प्रमाणात कामे
रखडलेल्या प्रसाधनगृहांचे काम, ई टॉयलेट्सची कामे
दिव्यांगांसाठी सुविधांबरोबरच भत्ता
नगररचनात बिल्डर्स ऐवजी मूळ मालकालाच टीडीआर
छोटी उद्याने रद्द, सहा थीम गार्डन
महापालिका प्रशासनाला गतिमान करीत फेररचना
५५ सेवा अ‍ॅपद्वारे उपलब्ध
विधवा, परितक्त्या, अनाथांसाठी मदतीची योजना
खेळाडूंसाठी मदतीची योजना

Web Title:  In just nine months, Tukaram Mundhe is in the middle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.