शेमळीत यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 06:24 PM2019-04-30T18:24:37+5:302019-04-30T18:26:28+5:30

शेमळी येथील ग्रामदैवत दादा पीर महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला. कुस्त्यांची दंगल लक्षवेधी ठरली. याही वर्षी महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.

The Junking Riot | शेमळीत यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल

जुनी शेमळी येथे मानाची कुस्ती लावताना माजी सरपंच राहुल शेलार व ग्रामस्थ.

Next

शेमळी : येथील ग्रामदैवत दादा पीर महाराज यात्रोत्सव उत्साहात पार पडला. कुस्त्यांची दंगल लक्षवेधी ठरली. याही वर्षी महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. यावेळी कुस्ती सामन्यासाठी सटाणा, मालेगाव, देवळा, कळवण, ताहाराबाद, नामपूर, आराई, नवी शेमळी विविध भागातून पहिलवानांनी हजेरी लावली. मानाची कुस्ती मालेगाव आणि लखापूर येथील पहिलवानांमध्ये रंगली. लखमापूर येथील अनिल पवार या पहिलवानाने मानाची कुस्ती जिंकण्याचा मान मिळवला. अनेक लहान-मोठ्या पहिलवानांनी आपले कसब दाखवून बक्षिसांची लयलूट केली.
दोन दिवस चाललेल्या या यात्रेत विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. सजवलेल्या रथातून दैवताची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीपुढे आदिवासी नृत्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले. सकाळपासून ग्रामस्थांनी ग्रामदैवत दादा पीर महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तरु णांसह आबालवृद्धांनी मिरवणुकात ठेका धरला. रात्री लोकनाट्य तमाशाचा ग्रामस्थांनी व परिसरातील रसिकांनी आनंद लुटला.

Web Title: The Junking Riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.