जम्मू-काश्मीरची शेकडो टुर्स रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:56 AM2019-02-19T00:56:01+5:302019-02-19T00:56:38+5:30

नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून चालणाºया अर्थकारणामुळे दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेदेखील पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Junk and Sukdo tours canceled | जम्मू-काश्मीरची शेकडो टुर्स रद्द

जम्मू-काश्मीरची शेकडो टुर्स रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटनावर परिणाम : व्यावसायिक पाठ फिरवण्याच्या तयारीत

संजय पाठक ।
नाशिक : पृथ्वीतलावरील नंदनवन मानल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर खोºयातील अशांतता तसेच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांत भीतीबरोबरच नाराजीचेदेखील वातावरण असून, त्यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टुर्स रद्द केल्या आहेत. काश्मीरमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून चालणाºया अर्थकारणामुळे दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानेदेखील पर्यटकांना तेथे न नेण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
दहशतवादी हल्ल्यात ४४ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे जाणाºया पर्यटकांमध्येच भीतीचे वातावरण आहे. मार्चपासून पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. केवळ पर्यटनाबरोबरच आता हनिमून पॅकेजेसदेखील सुरू असतात. परंतु दहशतवादी घटना वाढत चालल्या असून, त्यातच पुलवामामध्ये मोठा हल्ला झाल्यानंतर पर्यटनक्षेत्र हादरले आहे. बहुतांशी पॅकेजेस पर्यटकांनीच रद्द केले असून, टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यादेखील सहली रद्द करीत आहेत. देशावर इतका मोठा हल्ला होत असेल तर तेथेच पर्यटनासाठी जाण्याची आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असे टुर्स कंपन्यांनी सांगितले. (पान ७ वर)
जम्मू-काश्मीरला पर्याय म्हणून हिमाचल प्रदेश, सीमला, उटी, दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटकांना पाठविले जात असून, हा भाग त्या तुलनेत सुरक्षित असल्याने पर्यटकांनाही त्याच पॅकेजमध्ये कमी-अधिक दर करून जाण्यास तयार होत आहेत. पर्यटनच थांबल्याने त्याचा मोठा फटका काश्मिरी नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.
मुंबईतून अनेक टुर्स व्यावसायिकांनी काश्मीरच्या सहली रद्द केल्या आहेत. माझ्याकडे हनिमून कपलसह तीन अलीकडेच नोंदविल्या गेलेल्या सहली रद्द झाल्या आहे. पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यामुळे ते टुर रद्द करीत आहेत. त्याचप्रमाणे टुर्स व्यावसायिकांकडे कोणी हट्ट केल्यास संबंधितांना जोखमीवर जावे लागेल, असेही सांगत आहेत. कारण पर्यटक अडकल्यास त्यांना परत आणणे ही फार मोठी जोखीम आहे.
- दीपाली वागळे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, मुंबई
पर्यटनातून मिळणारा पैसा कश्मीरच्या विकासापेक्षा दहशतवाद्यांना मदतीसाठी होत असल्याची सध्या वॉट््सअ‍ॅप चर्चा सुरू असून, त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी यापुढे काश्मीरला टुर्स नेऊच नये, असे आवाहनदेखील सुरू केले आहे. त्यामुळे व्यावसायिकदेखील स्वेच्छेने टुर्स रद्द करीत आहेत.
- दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक

Web Title: Junk and Sukdo tours canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.