न्यायडोंगरीकर एक वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 07:38 PM2019-06-26T19:38:02+5:302019-06-26T19:38:37+5:30

न्यायडोंगरी : एक वर्षापासून न्यायडोंगरीत कायमस्वरूपी तलाठी नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठ्याची आठवडाभर वाट पहावी लागतेय. तर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गत तीन महिन्यापासून डॉक्टर विनाच चालतंय. ज्या गावाच्या नेत्यांच्या नावातच दबदबा आहे अशा गावाची परवड थांबता थांबेना.

Judiciary has been waiting for a permanent Talathi for a year | न्यायडोंगरीकर एक वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच्या प्रतिक्षेत

प्राथमिक आरोग्य केंद्राची १ कोटी ८० लाख रु पयांची भव्य प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात.

Next
ठळक मुद्देतीन महिन्यापासून आरोग्य केंद्र चालते डॉक्टर विना

न्यायडोंगरी : एक वर्षापासून न्यायडोंगरीत कायमस्वरूपी तलाठी नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठ्याची आठवडाभर वाट पहावी लागतेय. तर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गत तीन महिन्यापासून डॉक्टर विनाच चालतंय. ज्या गावाच्या नेत्यांच्या नावातच दबदबा आहे अशा गावाची परवड थांबता थांबेना.
दुष्काळाच्या दाहकते पुढे सर्वांनीच हात टेकले असतांनाच शासनाकडून दिला जाणारा दुष्काळ निधी जमा होण्यास अजूनही मुहूर्त लागत नाही. तसेच पंतप्रधान सन्मान योजनेचा ही येथे बट्या बोळ झालेला दिसतोय. कारण पहिल्याच टप्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंत त्याचा एक रु पयाही मिळालेला नाही. तसेच वृद्धापकाळ, संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना दररोज तलाठी कार्यालयाकडे चकरा माराव्या लागतात, मात्र गावातील सत्ताधारी आणि विरोधकांनी मात्र याकडे दुर्लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
सध्याचे प्रभारी तलाठी तुषार येवले यांच्याकडे वेहळगाव, मळगाव, कळमधरी, बिरोळा, हे गावे असतानाही न्यायडोंगरी सारख्या सतत वादासाठी संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या गावात १९०० शेतकरी खातेदारांना गेल्या एक वर्षांपासून आठवड्यातील दोनच दिवस काम करणारा तलाठी उपलब्ध असतो त्यात शासकीय सुट्टी किंवा वैयक्तिक रजा असल्यास आठ आठ दिवस तलाठीचे गावाला दर्शन होत नाही. आले तर त्यांचा चेहराही दिसत नाही एवढी गर्दी कार्यालयात होत असते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सध्याचे प्रभारी तलाठी तुषार येवले यांची न्यायडोंगरीसाठी कायस्वरूपी नियुक्ती व्हावी अशी मागणीही गावातून होत आहे.
आरोग्य केंद्र राम भरोसे का?
गेल्या तीन महिन्यापासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाºयांचे पद असताना दोन्हीही जागा रिक्त आहेत. त्यामुळे रु ग्णांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत आहे. प्रत्यक्षात तेथील काही कर्मचारी कागदोपत्री रु ग्ण तपासणी करून आरोग्य केंद्र चालवत आहे असे दृष्य दिसत आहे.
नव्याने सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्जून उभ्या केलेल्या भव्य ईमारतीचे काम अंतिम टप्प्यात दिसत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभरात तीनशे पेक्षा अधिक रु ग्ण तपासणी करत होते, बाळंतपणासाठी महिलांना सध्याच्या परिस्थिती मुळे खाजगी दवाखान्याकडे धशव घ्यावी लागत आहे. परिणामी शासनाकडून मिळणाºया सुविधा व लाभापासून अनेकांना वंचित राहावे लागत आहे
येथील एकूण १९ कर्मचारी प्रशासन असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र नेमकं कोणासाठी हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अनेक वर्षांपासून इथे चांगला डॉक्टर येऊन दिला जात नाही. दोन एम बी बी एस वैद्यकीय अधिकाºयाची येथे पोस्ट असताना देखील पाच वर्षांपासून बी ई एम एस शिक्षण असलेला वैद्यकीय कमी दर्जाच्या अधिकाºयाने संपूर्ण आरोग्य केंद्र एकट्याने सांभाळले.
गेल्या आठवड्यात रेल्वे तांड्यातील गरोदर महिला रविना नवनाथ चव्हाण या म्ािहलेच्या पोटात दुखू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टर नसल्याने आरोग्य सेविकेनीच तपासणी केली असता पुढील उपचारासाठी खाजगी वाहनाने नांदगाव ला घेऊन जावे लागेल अशा सूचना देऊन आपले अंग काढून घेतले त्यामुळे 4 ते 5 तास वाया गेले .त्यानंतर सरकारी रु ग्णवाहिका दिली पण तो पर्यंत खूप वेळ निघून गेल्याने व त्यात रस्त्याचे काम चालू असल्याने पोटात जास्त त्रास झाल्यामुळे व वेळेवर उपचार न झाल्यामुळे नवनाथ चव्हाण याने त्याच्या पत्नीस खासगी दवाखान्यात दाखल केले असता बाळाचा जन्मल्या नंतर मृत्यू झाला ही सर्व वाताहत केवळ येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यानेच होत आहे.
पूर्वी कुटुंब नियोजनासाठी नावलौकिक असलेलं कायमस्वरूपी उद्दिष्ट गाठणारे या प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळं नाव होत आठवड्यातून दोन कॅम्प घेत होते. पण गेल्या पाच वर्षांपासून कमी दर्जाचे शिक्षण असलेल्या वैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती असल्याने कुटुंब नियोजनाचा एक ही कॅम्प येथे होत नाही.

Web Title: Judiciary has been waiting for a permanent Talathi for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.