राजापूर परिसरात जागरण गोंधळाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:43 PM2019-05-21T18:43:22+5:302019-05-21T18:44:16+5:30

राजापूर : परिसरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असून त्यानिमित्ताने जागरण गोंधळाच्या कार्यक्र मांचा जारेदार धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे.

 Jangarun Gundhal's attack in Rajapur area | राजापूर परिसरात जागरण गोंधळाचा धडाका

राजापूर परिसरात जागरण गोंधळाचा धडाका

googlenewsNext

खंडोबा व देवीचा जागरण गोंधळाला ग्रामीण भागात विशेष महत्व आहे .सध्या नवीन लग्न झालेले जोडपे जेजुरीला देवदर्शन करून घरी आल्यावर कुलदैवत श्री जेजुरीचा खंडोबा व आई तुळजा भवानी यांचा जागरण गोंधळ घातला जातो. घरात सुख शांती नांदावी व संसारात अडचणी येऊ नये म्हणून जागरण व गोंधळ आयोजित केला जातो. सध्या राजापूर व परिसरात दररोज कुठे ना कुठे जागरण गोंधळ असतो. यात दिवट्या- बुधल्याच्या साहाय्याने रात्रभर देवाच्या नावाने दिवटीवर तेल जाळले जाते.रात्रभर वाघेमंडळी खंडोबा व देवीचे गीते तसेच पारंपरिक खंडोबा व म्हाळसाचीभांडण कथा आणि बानुबाईला देव जेजुरीला कसे आणतात हे कथेतून वाघेमंडळीआजही कथेतून सादर करतात. यामध्ये मुरळी मिराताई कावळे औरंगाबादकर यांनी आपल्या गीतांतून ‘चिमण्ये माझे माहेरी लग्न झाल्यावर जाणं बाईला परक्या घरी’ या गाण्यामधून मुलगी वाचवा, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा ,मुलगी शिकवा, देश वाचवा असा संदेश दिला. शिवमल्हार वाघे मंडळाने आजही गीतांची लोकप्रियता जपली आहे . तसेच आरधीन देवीचे गीत गाताना व डोक्यावर समई तसेच समईवर पाण्याने भरलेली घागर घेऊन सुंदर कला सादर केली. या जागरण कार्यक्रमात मिराताई कावळे यांनी किती नशीब थोर माझे, याने मला मुरळी बनवलं, अंबा खेळत आली या तसेच पोवाडा आा विविध कार्यक्रमातून उपस्थितांची करमणूक केली. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान खंडोबा देवाचा लंगर तोडण्यात आला व घटाचे ओझे उतरवून कार्यक्र माची सांगता झाली.
कोट...
ग्रामीण भागात आमच्या कार्यक्र माला भरभरून प्रतिसाद मिळतो. वयाच्या सहा वर्षांपासून आई- वडिलांनी मला नवसाने सोडलेली मुरळी म्हणून मला ओळखले जाते. सध्या महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात कार्यक्रम सुरु आहेत. आतापर्यंत अनेक कथा व गाण्यांच्या खजिना जनते पर्यंत पोहचवता आला, याचे समाधान वाटते.
- मिराताई चंद्रकात कावळे ,मुरळी, औरंगाबादकर

Web Title:  Jangarun Gundhal's attack in Rajapur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.