जालियनवाला हत्याकांड सर्वाधिक क्रू र कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:26 PM2019-07-20T23:26:40+5:302019-07-21T00:18:19+5:30

भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.

Jalianwala massacre most crew act | जालियनवाला हत्याकांड सर्वाधिक क्रू र कृत्य

जालियनवाला हत्याकांड सर्वाधिक क्रू र कृत्य

Next
ठळक मुद्देअंजली वेखंडे यांचे प्रतिपादन

नाशिक : भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या.
जालियनवाला बाग हत्याकांडास १३ एप्रिल २०१९ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्याने इतिहासातील या काळ्याकुट्ट दिनाच्या स्मरणार्थ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास संकलन समितीच्या सहकार्यवाह डॉ. अंजली वेखंडे यांच्या ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ या विषयावर जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात त्यांनी घटनेतील सर्व तपशील सांगितले.
याप्रसंगी मंचावर शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, विलास पूरकर, प्रदीप कुलकर्णी, इतिहास संकलन समितीचे कार्यवाह पंड्या, मुख्याध्यापक दयाराम अहिरे, संजय सूर्यवंशी, लता अंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. आजकाल मुले इतिहास विसरत चालली आहेत, त्यांना इतिहासाची माहिती व्हावी म्हणून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याता प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले.
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर संपूर्ण भारतभर इंग्रजांविरु द्ध असंतोष निर्माण झाला. त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात सत्याग्रह उभे राहिले. त्यानंतर सर्व भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध देशभरात सत्याग्रह केले.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यानंतर देशभरात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती, असेही डॉ. वेखंडे यांनी सांगून इतिहासातील मागोवा घेतला.

Web Title: Jalianwala massacre most crew act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.