जलशक्ती अभियान समितीने केला अचानक देवळा तालुक्याचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 07:12 PM2019-07-16T19:12:27+5:302019-07-16T19:12:53+5:30

खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे, शेरी व मटाणे या गावांना सोमवारी शासनाच्या जलशक्ती अभियान समितीच्या केंद्रीय निरीक्षक वसुंधरा पंत यांनी भेट देऊन शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ व त्यापासून शेतकऱ्यांना होणारा फायदा व पाणी टंचाई याची माहिती घेऊन लोकसहभागातून पाझर तलावातील गाळ उपसा झाल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

Jal Shakti Abhiyan Samiti has suddenly visited Devla taluka | जलशक्ती अभियान समितीने केला अचानक देवळा तालुक्याचा दौरा

मटाणे ता. देवळा येथे विहीर पुनर्भरण कामाची पाहणी करतांना शासनाच्या जलशक्ती अभियान समितीच्या केंद्रीय निरीक्षक वसुंधरा पंत, तहसीलदार दत्रात्रेय शेजुळ, विस्तार अधिकारी जयंत भामरे, कृषी अधिकारी सचिन देवरे आदी.

Next
ठळक मुद्देया दौर्यात समतिीने खर्डे, मटाने व शेरी या गावांना भेटी दिल्या.

खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे, शेरी व मटाणे या गावांना सोमवारी शासनाच्या जलशक्ती अभियान समितीच्या केंद्रीय निरीक्षक वसुंधरा पंत यांनी भेट देऊन शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ व त्यापासून शेतकऱ्यांना होणारा फायदा व पाणी टंचाई याची माहिती घेऊन लोकसहभागातून पाझर तलावातील गाळ उपसा झाल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
जलशक्ती अभियान समितीने सोमवारी अचानक देवळा तालुक्याचा दौरा केला. या दौर्यात समतिीने खर्डे, मटाने व शेरी या गावांना भेटी दिल्या. या दौºयाआधी समितीने तहसील कार्यालयात येऊन तालुक्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, पाणी आडवा पाणी जिरवा आदी कामांचा आढावा घेतला. तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, बहुतांश गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरु असलेल्या मटाणे येथील विहीर पुनर्भरण कामाची पाहणी केली. खर्डे येथील ब्राम्हण आंबा पाझर तलावातून लोकसहभागातून काढण्यात आलेल्या गाळ उपसा कामाची पाहणी केली.
शेरी येथे दुरु स्ती केलेल्या पाझर तलावाची व कृषी विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबांध बंधाºयाला भेट दिली. खरीप व रब्बी हंगामात घेण्यात येणाºया पिकांची माहिती घेऊन शासनाच्या मागेल त्याला शेततळे, पीक विमा, ठिबक सिंचन आदी प्रधानमंत्री योजनांविषयी थेट लाभार्थ्यांशी चर्चा केली.
यावेळी स्थानिक स्थरच्या श्रीमती पाटील, जलशक्ती अभियानाचे जिल्हा समनव्यक खैरनार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी महेंद्र बोरसे, तहसीलदार दत्रात्रेय शेजुळ, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, ग्रामविस्तार अधिकारी जयंत भामरे, जलसंधारण अधिकारी व्ही. जी. पवार, मंडळ कृषी अधिकारी परेश भोये, कृषी सहायक पंकज परदेशी, ग्रामविस्तार अधिकारी जयंत भामरे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, रुपेश आहेर, अनिल आहेर आदिंसह संबंधित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Jal Shakti Abhiyan Samiti has suddenly visited Devla taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी