ताहाराबाद विद्यालयात जलदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 07:27 PM2019-07-20T19:27:31+5:302019-07-20T19:28:01+5:30

ताहाराबाद : येथील मराठा विदां प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजतर्फे जन प्रबोधन व पाण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी गावात उत्साहात जलिदंडी काढण्यात आली.

Jal Din in Taharabad University | ताहाराबाद विद्यालयात जलदिंडी

ताहाराबाद विद्यालयात जलदिंडी

googlenewsNext
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन पाण्याचे महत्व समजून सांगितले.

ताहाराबाद : येथील मराठा विदां प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजतर्फे जन प्रबोधन व पाण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी गावात उत्साहात जलिदंडी काढण्यात आली.
प्रारंभी शालेय समिती अध्यक्ष केदा जाधव, उपसरपंच सिताराम साळवे, राजेंद्र भामरे, मुख्याध्यापक श्रीमती व्ही. व्ही. शेलार, उपमुख्याध्यापक आर. आर. सोनवणे व पर्यवेक्षक बागुल यांच्या हस्ते जलदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन पाण्याचे महत्व समजून सांगितले.
या वेळी मुख्याध्यापक श्रीमती शेलार, सोनवणे यांनी ‘पाणी म्हणजेच जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यालयातर्फे गावातून विविध घोषणादेत सवाद्य जलदिंडी काढण्यात आली.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन एन. के. शेवाळे यांनी तर आभार के. यू. बागुल यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी उपशिक्षक के. बी. जाधव, जी. एल. अहिरे, आर. सी. महाले, पी. एस. गोसावी, जे. पी. बच्छाव, के. बी. चव्हाण, पी. एस. निकम, अशोक देवरे, के. एम. पवार, एस. यू. भामरे, अमोल चव्हाण, राहुल पगार, डी. व्ही. सोनवणे, वाय. व्ही. पवार, एस. एस. वाघ आदींनी सहभाग घेतला.
 

Web Title: Jal Din in Taharabad University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.