ऐन उन्हाळ्यात प्रवाशांवर सावली शोधण्याची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:49 PM2019-05-30T17:49:41+5:302019-05-30T17:50:30+5:30

वावी : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील वावी येथील राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकाच्या शेडवरील पत्रे काढून घेतल्याने प्रवाशांना सावली शोधावी लागत आहे. मॉडेल स्थानक म्हणून वावी येथील हे स्थानक विकसित करण्यात येत आहे. मात्र ठेकेदाराकडून पर्यायी व्यवस्था करण्यापूर्वीच प्रवासी निवारा शेडचे पत्रे काढून घेण्यात आल्याने ४० अंश डिग्रीच्या तपमानात प्रवाशांवर सावली शोधण्याची वेळ आली आहे.

 It's time to find the shade of travelers in summer! | ऐन उन्हाळ्यात प्रवाशांवर सावली शोधण्याची वेळ !

ऐन उन्हाळ्यात प्रवाशांवर सावली शोधण्याची वेळ !

googlenewsNext

दहा दिवसांपासून प्रवाशांचे हाल होत असताना एस टी प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिर्डी रस्त्यावरील महत्वाचा थांबा असणाऱ्या वावी बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. नाशिक, शिर्डी, कोपरगावसह मुंबई, कोकण विभागातील बसेस तसेच गुजरातकडे जाणाºया बससाठी सिन्नरनंतर वावीचा थांबा महत्वाचा आहे. सिन्नरला बसेसची गर्दी पाहता शिर्डी -कोपरगाव महामार्गावरील सध्या जलद, निमआराम, शिवशाही बसेसला किमान पाच मिनिटांची विश्रांती थांबा वावी येथे मंजूर आहे. तीस वर्षांपासून या बसस्थानकात कोणत्याही नवीन सुविधा निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवासी निवारा शेडची दुरवस्था झाली होती. या शेडच्या दुरूस्तीसाठी गावातील पतसंस्था, सामाजिक मंडळांनी मदत केल्यामुळे उकिरड्यासमान दिसणाºया निवारा शेडचे तीन वर्षांपूर्वी रूपडे बदलले होते. वावी येथील बसस्थानक मॉडेल बसस्थानक ठरावे यासाठी आमदार वाजे आग्रही असून गेल्या शिवजयंतीला याचे भूमीपूजन देखील पार पडले आहे. सर्व मान्यता असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत प्रत्यक्ष काम सुरू होत नव्हते. गेल्या पंधरवड्यात मात्र या कामाच्या बांधकाम ठेकेदाराने पूर्वतयारी म्हणून आवारात पत्र्याचे शेड उभारले. प्रवासी शेडच्या अस्तित्वात नवीन बांधकाम सुरू करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था न करताच या शेडचे पत्रे खोलण्यात आल्याने प्रवाशांना उन्हात आणण्याचा प्रकार घडला आहे. बसस्थानकाच्या आवारात सावलीची पर्यायी व्यवस्था तातडीने करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title:  It's time to find the shade of travelers in summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.