आज दिसणार ‘सुपर ब्लू ब्लड मून’ १८६६ नंतर खगोलीय घटनेचा आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:36 AM2018-01-31T01:36:45+5:302018-01-31T01:37:12+5:30

नाशिक : नववर्षाचा पहिला चंद्र नाशिककरांना सुपर मून म्हणून बघता आला;

The invention of astronomical phenomena after 1866 'Super Blue Blood Moon' will be seen today | आज दिसणार ‘सुपर ब्लू ब्लड मून’ १८६६ नंतर खगोलीय घटनेचा आविष्कार

आज दिसणार ‘सुपर ब्लू ब्लड मून’ १८६६ नंतर खगोलीय घटनेचा आविष्कार

Next

नाशिक : नववर्षाचा पहिला चंद्र नाशिककरांना सुपर मून म्हणून बघता आला; मात्र बुधवारी (दि.३१) नववर्षाच्या पहिल्या महिन्याचा अखेरचा चंद्र हा केवळ सुपर नव्हे, तर ‘ब्लू ब्लड मून’ म्हणून बघण्याची संधी खगोलीय आविष्कारामुळे उपलब्ध झाली आहे. संध्याकाळी ६ वाजून २१ मिनिटापासून हा खगोलीय आविष्कार अनुभवता येणार आहे. जानेवारी महिन्यात दोन पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि पृथ्वी-चंद्रामध्ये कमी होणारे अंतर असे तीनही बदल एकाच दिवशी बुधवारी घडून येणार असल्यामुळे खगोलशास्त्रज्ञांनी या सर्व बदलांचा आविष्काराला ‘सुपर ब्लू ब्लड मून’असे नाव दिले आहे. १८६६ साली असा खगोलीय आविष्कार अनुभवयास आला होता. पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला आणि तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी तर ग्रहणामुळे लालसर (ताम्रवर्णी) सुपर मून बघण्याची १५० वर्षांनंतर

Web Title: The invention of astronomical phenomena after 1866 'Super Blue Blood Moon' will be seen today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक