कोलकाता येथील निवासी डॉक्टरांवर हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:47 PM2019-06-17T17:47:37+5:302019-06-17T17:50:15+5:30

येवला : कोलकाता येथे निवासी डॉक्टरांवर काही समाज कंटाकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१७) इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या देशव्यापी संपास येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची सदस्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध करीत तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

Invasion of resident doctors in Kolkata | कोलकाता येथील निवासी डॉक्टरांवर हल्ल्याचा निषेध

कोलकाता येथे निवासी डॉक्टरांवर हल्ल्याचा निषेध करीत डॉक्टर संघटनेनेने तहसील कार्यालयावर काढलेला मोर्चा.

Next
ठळक मुद्देयेवल्यातील डॉक्टरांनी काढला तहसील कार्यालयावर मोर्चा

येवला : कोलकाता येथे निवासी डॉक्टरांवर काही समाज कंटाकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१७) इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या देशव्यापी संपास येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची सदस्यांनी दिवसभर काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध करीत तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले. व इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपत सहभागी होत असल्याचे सांगितले.
डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदे करून डॉक्टरांना संरक्षण पुरवण्याची मागणी निवेदनात केली. सोमवारी सकाळी येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश वाघ,
सेक्र ेटरी डॉ. योगेश जेजुरकर, कोषाध्यक्ष डॉ. प्रभाकर तुसे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ. निर्मल गोसावी, डॉ. अनंत बारे, डॉ. सुजित सोनवणे, डॉ. बाबासाहेब खैरनार, डॉ. राजीव चांडालिया, डॉ. महेश्वर तगारे, डॉ. जयप्रकाश करवा, डॉ. संतोष जाधव, डॉ. माजिद फारुकी, डॉ. इम्तियाज जमील, डॉ. साताळकर, डॉ. गणेश सवलके, डॉ. रावसाहेब पवार, डॉ. झीनत कौसर, डॉ. निशात शहा आदी सहभागी झाले होते.
डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाबाबत शासनाने दाखल घ्यावी. विघातक कृत्य करणारे व जीवघेणा हल्ला करणाºया वृत्तींना धडा शिकवण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे.
डॉ. गणेश वाघ,

Web Title: Invasion of resident doctors in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर