गावागावांत ‘अन्याय पे चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:37 PM2018-01-31T23:37:37+5:302018-02-01T00:00:01+5:30

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असून, त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा नाशिक जिल्हा व येवला मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्या अन्यायाच्या निषेधार्थ येवला मतदारसंघात प्रत्येक गावागावांत अन्याय पे चर्चा करून जनतेमध्ये जनजागृती केली जाईल, असे लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. जयदत्त होळकर यांच्या निवासस्थानी ‘अन्याय पे चर्चे’चे आयोजन करण्यात आले होते.

'Injustice on talk' in village panchayat | गावागावांत ‘अन्याय पे चर्चा’

गावागावांत ‘अन्याय पे चर्चा’

Next

लासलगाव : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असून, त्यांच्यावर होत असलेला अन्याय हा नाशिक जिल्हा व येवला मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्या अन्यायाच्या निषेधार्थ येवला मतदारसंघात प्रत्येक गावागावांत अन्याय पे चर्चा करून जनतेमध्ये जनजागृती केली जाईल, असे लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. जयदत्त होळकर यांच्या निवासस्थानी ‘अन्याय पे चर्चे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, मधुकर जेजूरकर, उपसभापती ललित दरेकर, गुणवंत होळकर, वनसगाव सरपंच उन्मेष डुमरे, ब्राह्मणगावचे सरपंच मंगेश गवळी, संतोष ब्रह्मेचा, सचिन होळकर, विकास चांदर आदी उपस्थित होते.  यावेळी बोलताना गुणवंत होळकर म्हणाले की, छगन भुजबळ हे जिल्ह्याचे व मतदारसंघाचे नेते असून, मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांचा त्यांना पाठिंबा असून, होणाºया आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. दत्ता रायते, वनसगावचे सरपंच उन्मेष डुमरे, ब्राह्मणगावचे सरपंच मंगेश गवळी यांनी भुजबळांवर होत असलेली कारवाई संशयास्पद असल्याचे चर्चेदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: 'Injustice on talk' in village panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.