भुजबळांच्या समर्थनासाठी ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:04 AM2018-01-24T00:04:45+5:302018-01-24T00:18:36+5:30

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्र म आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लवकरच ग्रामीण तसेच शहरातील प्रभागांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर ‘अन्याय पे महाचर्चा’ हा कार्यक्र म आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती भुजबळ समर्थक समन्वय समितीचे समन्वयक दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी दिली आहे.

 'Injustice on talk' program for the support of Bhujbal | भुजबळांच्या समर्थनासाठी ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम

भुजबळांच्या समर्थनासाठी ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्रम

Next

पंचवटी : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्र म आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लवकरच ग्रामीण तसेच शहरातील प्रभागांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर ‘अन्याय पे महाचर्चा’ हा कार्यक्र म आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती भुजबळ समर्थक समन्वय समितीचे समन्वयक दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी दिली आहे.  भुजबळांच्या समर्थनार्थ नुकतीच सर्वपक्षीय समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत अन्यायाच्या विरोधात भुजबळ समर्थक जोडो अभियान राबविण्याची घोषणा सर्वपक्षीय समर्थकांनी केली. या अभियानांतर्गत भुजबळ यांच्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ प्रत्येक खेड्या-पाड्यात व शहरातील गल्लोगल्लीत समर्थकांच्या घरी चहा-पाण्यासाठी नागरिकांना बोलवून ‘अन्याय पे चर्चा’ हा कार्यक्र म राबवला जाणार आहे. कार्यक्रमात सहभागी कार्यकर्ते, आयोजक तसेच नागरिकांची मते, विचार संकलित केले जाणार आहे. अन्याय पे चर्चेच्या माध्यमातून सर्व तालुक्यांतील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून चर्चेसाठी कार्यक्र म दिला जाणार आहे. चर्चेत समर्थकांची मते, सूचना जाणून घेऊन नाशिकला जिल्हास्तरीय ‘अन्याय पे महाचर्चा’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात येणार आहे.  या महाचर्चेत विविध विचारवंत, विधीज्ञ, राजकीय विश्लेषक व समाजसेवक सहभागी होणार असून, बुधवारी (दि.२४)  कार्यक्र माला सुरु वात होणार असल्याचे समन्वय समितीचे समन्वयक खैरे यांनी सांगितले.

Web Title:  'Injustice on talk' program for the support of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.