ओझरहून कार्गोमार्गे निकृष्ट शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:46 AM2018-06-23T00:46:43+5:302018-06-23T00:47:16+5:30

ओझर विमानतळावरून गेल्या काही दिवसांपासून हवाईमार्गे जिवंत शेळ्या व मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली असून, अशी निर्यात करताना जनावरांची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आजारी व निकृष्ट दर्जाच्या शेळ्या-मेंढ्या पाठविल्या जात आहेत.

Inexpensive sheep and goats exported from Ojhar | ओझरहून कार्गोमार्गे निकृष्ट शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

ओझरहून कार्गोमार्गे निकृष्ट शेळ्या-मेंढ्यांची निर्यात

Next

नाशिक : ओझर विमानतळावरून गेल्या काही दिवसांपासून हवाईमार्गे जिवंत शेळ्या व मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली असून, अशी निर्यात करताना जनावरांची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता आजारी व निकृष्ट दर्जाच्या शेळ्या-मेंढ्या पाठविल्या जात आहेत. परदेशात या जनावरांच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली तर संपूर्ण भारतातीलच जनावरांची निर्यात बंद होण्याचा धोका असल्याने निर्यात होणाऱ्या जनावरांची तपासणी केली जावी, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली आहे.  यासंदर्भात पशुसंवर्धन खात्याच्या सहसंचालकांना दिलेल्या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे की, अजमेर, राजस्थान आदी राज्यांतील स्वस्त दरातील शेळ्या-मेंढ्या खरेदी करून त्या तेथून ट्रकमध्ये कोंबून नाशिकच्या ओझर विमानतळावर आणल्या जातात. या सर्व शेळ्या-मेंढ्या ट्रकमधून आणत असताना वातावरणातील बदल तसेच आजारी बकºयांच्या संसर्गामुळे बºयाचशा शेळ्या-मेंढ्यांना पी.पी.आर. व एफ.एम.डी. ब्रुसेला अशा रोगांची लागण झालेली असते. सदर शेळ्या व मेंढ्या नाशिक येथील ओझर विमानतळावर आणल्यानंतर त्यांची कोणत्याही प्रकारची चाचणी न घेता सदर शेळ्यांची दोन तासांत विमानाद्वारे निर्यात केली जाते. शेळ्या-मेंढ्या निर्यात करताना प्रत्येक देशाचे काही नियम आहेत. बºयाचशा देशांमध्ये शेळ्या-मेंढ्या विमानतळावर आणल्यानंतर त्यांना कमीत कमी पंधरा दिवस हा क्वारंटाइन कालावधीमध्ये ठेवावे लागते. तेथे प्रत्येक बकºयाचे रक्त तसेच शारीरिक तपासणी केली जाते. शारीरिक तपासणीमुळे प्रत्येक शेळी-मेंढीची तपासणी होऊन त्या निर्यातीयोग्य असल्याचा दाखला घेतला जातो. सदरच्या शेळ्या-मेंढ्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या अवैध वस्तूंची तस्करी होऊ नये याची शहानिशा केली जाते. या सर्व गोष्टींना फाटा देऊन गेल्या काही दिवसांपासून ओझरहून शेळ्या-मेंढ्यांची निर्यात केली जात असून, या निर्यातीसाठी कमीत कमी पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक शेळी-मेंढीची रक्त व शारीरिक तपासणी करून व्यापाºयांना तसा अहवाल देण्यात यावा. आपल्या देशातून आजारी बकºयांची निर्यात झाल्यास आपल्या देशाचे नाव काळ्या यादीत जाऊन खराब होण्याची शक्यताही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.  गेल्या काही वर्षांपासून शेळ्या-मेंढ्यांच्या निर्यातीबाबतचे सर्व प्रकारची पूर्तता तसेच जनावरांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन आपण निर्यात करीत आहोत. परदेशात भारतीय शेळ्या-मेंढ्यांना मागणी असल्यामुळे त्यांना उच्च दर्जाचा माल पुरविणे आपले कर्तव्य असल्याकारणाने आम्ही बाजारातून धडधाकट व निरोगी शेळ्या-मेंढ्या खरेदी करतो तसेच ओझर विमानतळावर पंधरा दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निगराणीखाली त्या ठेवल्या जातात. यंदाही जुलै महिन्यात पहिली निर्यात केली जाणार आहे; परंतु काही निर्यातदार निव्वळ पैसे कमविण्याच्या नादात नियम-निकष पाळत नाही.  - प्रशांत सानप, निर्यातदार, नाशिक

Web Title: Inexpensive sheep and goats exported from Ojhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक