बागलाण मधील प्रस्तावित एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:52 PM2019-06-17T17:52:01+5:302019-06-17T17:52:45+5:30

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या तालुक्यातील खमताणे येथील प्रस्तावित एमआयडीसी कार्यान्वित करण्याची मागणी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

 Industry ministers to implement the proposed MIDC in Baglan | बागलाण मधील प्रस्तावित एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्र्यांना साकडे

बागलाण तालुक्यातील खमताणे येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी मंजुरी मिळावी या मागणीचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना देताना भाजप व्यापारी आघाडीचे बिंदू शर्मा, पप्पू बच्छाव, लालचंद सोनवणे आदी.

Next
ठळक मुद्देचर्चेदरम्यान उद्योगमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या तालुक्यातील खमताणे येथील प्रस्तावित एमआयडीसी कार्यान्वित करण्याची मागणी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.
देसाई शुक्र वारी (दि.१४) मालेगाव दौऱ्यावर आले असताना भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बिंदू शर्मा, माजी जि. प. सदस्य पप्पू बच्छाव व शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उद्योगमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे सूतोवाच केल्याने बागलाण एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
तत्कालीन युती सरकारने बागलाण तालुक्यासाठी खमताणे येथे एमआयडीसीची घोषणा केली. त्यानंतर वीस वर्षाहुन अधिक काळ लोटला अद्यापही एमआयडीसीसाठी मुहूर्त सापडलेला नाही. एमआयडीसीसाठी खमताणे येथे शासन मालकीची सुमारे तीनशे एकर जमीन असून ती आजही वापराविना पडून आहे.
दुसरीकडे औद्योगिक वसाहतीच्या अभावी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेचे तालुक्यातील अर्थकारणही मंदावले आहे. या गोष्टीचा विचार करून तालुक्यातील खमताणे येथील एमआयडीसी सुरू झाल्यास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच तालुक्यातील अर्थकारणाला मोठा हातभार लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title:  Industry ministers to implement the proposed MIDC in Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.