सव्वा महिन्यात इंदिरानगरला दुसरा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:32 AM2019-02-21T01:32:09+5:302019-02-21T01:33:23+5:30

या सव्वा महिन्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी खुनाची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. पहिली घटना भरवस्तीत ८ जानेवारी रोजी रात्री घडली होती.

 Indiranagar murders second month | सव्वा महिन्यात इंदिरानगरला दुसरा खून

सव्वा महिन्यात इंदिरानगरला दुसरा खून

Next

इंदिरानगर : या सव्वा महिन्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी खुनाची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. पहिली घटना भरवस्तीत ८ जानेवारी रोजी रात्री घडली होती. सहा लाखांची लूट करण्यासाठी व्यावसायिकाचा खून करण्यात आला होता. या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, पाथर्डीगावातील सुखदेवनगरमधील रितेश अनिल पाईकराव (१९) या युवकाचा कुरापत काढून मंगळवारी (दि.१९) रात्रीच्या सुमारास खून करण्यात आला. संशयित आरोपींचे काही महिन्यांपूर्वी पाईकरावसोबत भांडण झाले होते. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रितेश पाईकराव ‘बाहेर जाऊन येतो’, असे सांगून घरातून निघाला, मात्र रात्री साडेअकरा वाजले असतानाही तो पुन्हा घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांसह अन्य नातेवाईक त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडले असता आरडाओरड सुरू असल्याचे व गर्दी झाल्याचे दिसले. त्या ठिकाणी रितेश याच्यावर संशयित नयन सुरेश शिंदे, नरेश नाना दोंदे, उमेश कोंडीबा आव्हाड यांसह तिघा अल्पवयीन साथीदारांनी हातात तलवार व चाकूसारखे धारदार शस्त्र घेऊन हल्ला चढविला.
वडिलांसमोरच मुलावर वार
पाथर्डी गावातील एका किराणा दुकानासमोर संशयित अरविंद सोनवणे हा तलवारीने रितेशवर वार करत असल्याचे मयताचे वडील अनिल यांनी बघितले. त्यांनी मुलाला वाचविण्यासाठी जावयासोबत त्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, हल्लेखोर अरविंद व त्याचे सगळे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. अनिल यांनी जखमी मुलाला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title:  Indiranagar murders second month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.